पराभव झाला, जडेजा रडला आणि काही तरी बोलला?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताला 18 धावांनी पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले होते.

भारताला विजय मिळून देण्यात अपयशी ठरलेला जडेजा पूर्णपणे खचू गेला होता. सामन्यात पराभव झाल्यानंतर तो बराच काळ रडत होता अशी माहिती त्याची पत्नी रिवाबा सोलंकी हिने दिली आहे. पराभवानंतर त्याचं रडणं थांबतच नव्हतं. तो रडता रडताच सतत ‘मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य बडबडत होता,’ असे तिने सांगितले.

अहमदाबाद : जिगरबाज खेळी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पराभवानंतर मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य सतत रडत बोलत होता, असे त्याची पत्नी रिवाबा हिने सांगितले.

 

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताला 18 धावांनी पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. या सामन्यामध्ये जाडेजाने 77 धावांची खेळी करूनही भारताला पराभव टाळता आला नव्हता. धोनी आणि जाडेजाची जोडी मैदानात असेपर्यंत भारतीय चाहत्यांच्या विजयाच्या आशा कायम होत्या. मात्र जडेजा 77 धावांवर झेलबाद झाला आणि त्यानंतर धोनी 50 धावांवर धावबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News