विभागात आयटीआयच्या १८ हजार ४८० जागा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

औरंगाबाद - औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय प्रवेशप्रक्रिया इयत्ता दहावीच्या निकालाच्या आगोदरच सुरू करण्यात आली आहे. ही प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून (ता. तीन) सुरू करण्यात आली आहे. औरंगाबाद विभागात यंदा १८ हजार ४८० प्रवेश क्षमता असल्याने विद्यार्थ्यांची नोंदणीसाठी लगबग सुरू झाली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (आयटीआय) अंतर्गत शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील २०१९-२० ची प्रवेशप्रक्रिया सुरू असून, यासंबंधीचे वेळापत्रक संचालनालयातर्फे जाहीर केले आहे. प्रवेश अर्ज नोंदणी, दुरुस्ती आणि ऑनलाइन अर्जाच्या प्रिंटसाठी उमेदवारांना तीन ते ३० जूनपर्यंत मुदत दिली आहे.

मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर अर्ज स्वीकृती केंद्रात शुल्क भरून अर्ज निश्‍चित करण्यासाठी सहा जून ते एक जुलैपर्यंतचा कालावधी दिला आहे. पहिल्या फेरीची गुणवत्तायादी चार जुलैला जाहीर होईल. त्यानंतर पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्तायादी नऊ जुलैला संकेतस्थळावर दिली जाईल. दहा जुलैला प्रवेश फेरीसाठीची संस्था आणि व्यवसाय निवड यादी जाहीर करण्यात येईल. 

औरंगाबाद  विभागाच्या जागा 

  • शासकीय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय - १४ हजार ८४८
  • खासगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय - ३ हजार ६३
  • विभागातील एकूण रिक्त जागा - १८ हजार ४८०

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News