तुमच्यासाठी ती फक्त झाडे होती परंतु, आमचं घर होतं

अमोल गिरी, लातुर
Monday, 22 July 2019

तोंडाने बोलताही येत नाही. मग ते वसाहतीत, शेतात घुसले की ञासदायक, धुमाकुळ म्हनायला मानव मोकळा. जसे मानवी प्रश्न मांडुन तोडगे काढता तसेच प्राण्यांचे प्रश्न समजावुन घेवुन, त्यांच्या भावना लक्षात घेवुन त्यावरही तोडगे काढन्याच कर्तव्य खासदार, आमदार, पांढरेशुभ्र पेहराव- हातात पाच सोनेच्या अंगठ्या-फिरायला भरारी असनारया नेतेमंडळीच आहे.

प्राण्यांना बोलता येत नाही परंतु, त्यांचे काही चलचिञ, वागने हे मानवाला ञासदायक वाटत असले तरी; त्यात प्राण्यांचा दोष नसतो कारण, स्वार्थासाठी जंगले तोडुन (प्राण्यांच जग) तोडुन ईमारती, वसाहती मानवाने तयार केल्या, जंगलक्षेञातच जमिनी घेवुन रान मांडल आता, तिथेच हे मुकप्राणि येत आहेत, शेतीला, मानवी वसाहतीला ञासदायक, धोका वाटत आहेत ; हे जरी सत्य असल तरी, त्यामागे मुळ कारने काय आहेत याचा आभ्यास केला पाहिजे.

आमच्या वसाहतीत बिबट्या शिरला, आमच्या शेतात हरनाच कळप शिरुन पिकांच नुकसान झाल, मानवी वस्तीत माकडांचा धुमाकुळ असतो असे मुक प्राण्याबाबत बरेच प्रश्ननांच वावटळ केल जात व ते सत्यच असत परंतु, हा विचार केला गेला का? की, मानवी प्रश्नावर विभागनिहाय खासदार संसदेत तर आमदार विधानसभेत, नगरसेवक महानगरपालिकेत, सरपंच ग्रामपंचायतेत मानवी जिवनामानावर प्रश्न मांडुन त्यावर तोडगा काढत असतात व ते ही पटल नाही तर मनुष्य मोर्चे, अंदोलन, रस्तारोको अशी धुमाकुळ घालुन मानवी प्रश्न मांडत असतात. परंतु, मुक्या प्राण्यांनी काय करायच? अंदोलन? रस्तारोको? मोर्चे? बर, त्या प्राण्यांकडे कोनी खासदार, आमदार, नगरसेवक, सरपंच पण नाहीत ते ऐकट्यानेच प्रश्न मांडायला बर, प्रश्न मांडायचे कोनाकडे? ना सांसद, ना विधानसभा, ना ग्रामपंचायत.

तोंडाने बोलताही येत नाही. मग ते वसाहतीत, शेतात घुसले की ञासदायक, धुमाकुळ म्हनायला मानव मोकळा. जसे मानवी प्रश्न मांडुन तोडगे काढता तसेच प्राण्यांचे प्रश्न समजावुन घेवुन, त्यांच्या भावना लक्षात घेवुन त्यावरही तोडगे काढन्याच कर्तव्य खासदार, आमदार, पांढरेशुभ्र पेहराव- हातात पाच सोनेच्या अंगठ्या-फिरायला भरारी असनारया नेतेमंडळीच आहे परंतु, यांना मानवी प्रश्नच सुटत नाहीत ते प्राणी प्रश्नावर काय बोलनार? कुठे त्यात त्यांचा स्वार्थ आहे की मत भेटनारेत? लोकांच काय बोंबलतील काही दिवसाने गप्प होतील व लागतील प्रचार कामाला! "नेता हो तो कैसा हो" "जय जय नेता" "अरे निवडुन निवडुन येनार कोन; आमच्या नेत्याशिवाय दुसर कोन" "माय-बाप नेता"......

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News