(VIDEO) मूकबधिर विद्यार्थांकडून पाय चेपून घेणं शिक्षिकेला पडलं महागात; शिक्षिकेला 5 वर्षांची तुरूंगवारी

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Friday, 15 November 2019

अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शासकीय मूकबधीर विद्यालयात कार्यरत असलेली ही शिक्षिका मुकबधीर विद्यार्थ्यांकडून सेवा करवून घ्यायची. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय.

अकोला: मूकबधिर विद्यार्थांकडून सेवा करवून घेणं 'या' शिक्षेकेला चांगलच महागात पडलंय. पाय चेपून घेणाऱ्या महिला शिक्षिकेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय. पोस्को कायद्याअंतर्गत त्या शिक्षिकेला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय.

 

व्हिडीओत दिसणारी हीच ती महिला शिक्षिका..जिला कोर्टानं चांगलाच धडा शिकवलाय. शीतल अवचार असं या महिला शिक्षिकेचं नाव आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवरील शासकीय मूकबधीर विद्यालयात कार्यरत असलेली ही शिक्षिका मुकबधीर विद्यार्थ्यांकडून सेवा करवून घ्यायची. हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय. दरम्यान अकोला जिल्हा सत्र न्यायालयानं पोस्को कायद्याअंतर्गत या महिलेला दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा आणि 30 हजारांचा दंड सुनावलाय. 

शिक्षा सुनावून कोर्टानं या महिला शिक्षिकेला चांगलाच दणका दिलाय. कोर्टाच्या या निर्णयानं मुकबधीर विद्यार्थ्यांच्या अगतिकतेचा फायदा घेत त्यांच्याकडून सेवा करवून घेणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News