'ती' साथ मैत्री देत असते...

रसिका जाधव
Sunday, 4 August 2019

ज्याच्या आयुष्यात निखळ मैत्री करणारे मित्र आणि मैत्रिणी असतात, त्याच्या आयुष्यात कधीच दुःख नसते आणि आले तरी ते दुःख पचवण्याची ताकद ती मैत्री देत असते.

तसा मैत्रीसाठी एखादा दिवस पुरेसा नसतो आणि नसावाही; पण तरीही ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभरात जागतिक मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो म्हणून माझ्याकडून सगळ्या मैत्रीदिनाच्या शुभेच्छा. आपल्या आवडीच्या आणि जवळच्या व्यक्तींना आपल्या मनातील मैत्रीच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस असतो. 

यावेळी अगदी रुसलेल्या, खूप दिवसांनी भेटणाऱ्या मित्रांना आपण आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगून शेअर करत असतो. मैत्रीसाठी वयाची मर्यादा नसते, मैत्री ही कोणासोबतही केली जाते. हे एकच नातं अस आहे, ज्या नात्यात कोणता ही स्वार्थ नसतो. निस्वार्थी असते मैत्री. 

मैत्री ही कधीच ठरवून केली जात नाही. ती सहज केली जाते. मैत्रीमध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत नसते. मैत्रीमध्ये कोणतेच बंधन नसते. माझ्या आयुष्यातील माझी पहिली मैत्रीण माझी आई आहे, त्यानंतर माझ्या दोन मोठ्या बहिणी आणि माझ्या आयुष्यातील माझा पहिला मित्र माझे बाबा आहेत. 

माझ्या आयुष्यात खुप मित्र-मैत्रिणी आहेत. शालेय जीवनपासून ते महाविद्यालयापर्यंत, असे सर्व मित्र-मैत्रिणी आहेत.  माझ्या आयुष्यात मैत्रिणी कमी आहेत; पण मित्र खुप आहेत. माझ्या आयुष्यात १० वर्षांची मैत्रिण आहे आणि ७५ वार्षंचीसुद्धा मैत्रिण आहे.

मैत्री म्हणजे संकटात सदैव पाठीशी उभे असणे. मैत्री म्हणजे आपण चुकलं तर आपल्या कानाला पकडून आपली चूक दाखवणं ही खरी मैत्री असते, एवढेच नव्हे तर आपण चुकीच्या मार्गाने जात असेल तर योग्य मार्गवर आणते ती मैत्री असते; पण आत्ताच्या जमान्यात अशी मैत्री बघायला मिळत नाही.

ऑनलाईनच्या जमान्यात ही मैत्री हरवली आहे, कारण आत्ताची मैत्री म्हणजे काय काम असेल तर मॅसेज कारायचं नाही तर मित्रांची आठवणही येत नाही. आत्ताची मैत्री ही कामापूर्ती झालेली असते असं माझं प्रामाणिक मत आहे. 

ज्याच्या आयुष्यात निखळ मैत्री करणारे मित्र आणि मैत्रिणी असतात, त्याच्या आयुष्यात कधीच दुःख नसते आणि आले तरी ते दुःख पचवण्याची ताकद ती मैत्री देत असते. माझ्या आयुष्यात असे अनेक मित्र आहेत, म्हणून मी नशीबवान आहे की, माझ्या आयुष्य एवढे चांगले मित्र आहेत.
 अशा माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News