आत्मप्रेरणेतूनच असे हिरे निर्माण होतात

लक्ष्मण जगताप, बारामती
Saturday, 27 July 2019

कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेला, केवळ टिव्ही बघून आत्मप्रेरणेच्या जोरावर भारतीय संघातील गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ बनलेला अहमदाबादचा गुणी खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमरा. 

आत्मविश्वास म्हणजे स्वतः वरील अढळ विश्वास. जिंकण्याचा सशक्त हुंकार. आपल्याकडे काही करण्याची सर्व क्षमता आणि कौशल्ये असतानाही, जर आपण ठरविले की हे मला जमू शकणार नाही, तर आपण ती गोष्ट पूर्ण करण्याचे अथवा यश मिळविण्याचे सर्व मार्ग स्वतः च बंद करत असतो. 

याउलट आपण जर स्वतः शी म्हणालो 'हे मी करु शकतो, ही स्पर्धा मी जिंकू शकतो असे मनात आणले तर निदान आपण प्रयत्न तरी करतो. पण मनातून हरलेला कधीच यशस्वी होऊ शकत नाही. ज्याच्या अंगी आत्मबल म्हणजेच आत्मप्रेरणा असते तो हार न मानता प्रयत्न करतो. त्याला प्रयत्न केल्याचा आनंदही मिळतो. 

कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेतलेला, केवळ टिव्ही बघून आत्मप्रेरणेच्या जोरावर भारतीय संघातील गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ बनलेला अहमदाबादचा गुणी खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमरा. 

बरेचसे क्रिकेटपटू मैदानात जाऊन क्रिकेट शिकतात पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे जसप्रीत टिव्हीवर सामने बघून जास्त क्रिकेट शिकला. घरातील हॉल मोठा असल्यामुळे जसप्रीत घरातच यॉर्करचा सराव करायचा. आजच्या घडीला जसप्रीत जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून गणला जातो. हे यश आत्मप्रेरणेचे आहे. लहानपणापासून तो शेती, नदीकाठी फिरायचा. निसर्गानेच त्याला चिञांची दृष्टी दिली. 

पाटी, पेन्सिल आणि मग खडूने तो निसर्गचिञ रंगवू लागला आणि आता तो व्यक्तिचिञांकडे वळलाय. त्याला कोणताही गुरु नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही की मान्यवर चिञशाळेचा विद्यार्थी देखील नाही. तरी वयाच्या अठराव्या वर्षीच इटलीतील जगप्रसिद्ध फ्लोरेन्स अँकँडमी अॉफ आर्ट या संस्थेत पोचलाय. ते केवळ आकलनशक्ती, स्वकर्तृत्व आणि सर्वांत महत्वाची आत्मप्रेरणा. 

वडील रखवालदाराची नोकरी तर आई घरकाम करते. परंतु मुलाची कला आणि इच्छाशक्ती बघून आईवडीलांनी सर्व अडीअडचणी बाजूला सारुन त्याला साथ दिली. जगभरातून आलेल्या दोन हजारांहून अधिक चिञांतून पहिल्या दहा चिञांत तिसऱ्या क्रमांकासाठी निवडलेला तो एकमेव भारतीय युवा चिञकार आहे तो म्हणजे प्रेम आवाळे. पुण्यातील दिघी परिसरात राहणारा. 

आत्मप्रेरणेतूनच असे हिरे निर्माण होतात. त्यांना पाठबळ मिळाले की आणखी आत्मबळ मिळते मग त्यांच्या यशाचा वारु चौखार उधळू लागतो... तो अत्यंत वेगाने 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News