दाराआड ठरलेल्या गोष्टी आम्ही रस्त्यावर मांडत नाही

यिनबझ टीम
Thursday, 14 November 2019

अखेर सत्ता स्थापनेच्या पेच थांबल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये अमित शहांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आपली मते मांडली.

दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर संपला. बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपालांकडून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन बड्या पक्षांना संधी दिली असताना कोणताही पक्ष बहुमत सिध्द करू शकला नाही, यामुळे राज्यपालांच्या शिफारसीनुसार ही राजवट लागू करण्यात आली. 

अखेर सत्ता स्थापनेच्या पेच थांबल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये अमित शहांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर आपली मते मांडली.

शिवसेना त्यांच्या 50-50 च्या फॉर्म्यूल्यावर ठाम होती, त्यांना मुख्यमंत्री पद हवं होतं, मात्र निवडुकांचा प्रचार सुरू असताना ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस पुन्हा आपणच मुख्यमंत्री होणार  असल्याचा नारा देत होते, त्यावेळेस मात्र कोणीच काही बोलत नव्हते, अशाप्रकारचे मत अमित शहांनी आपल्या मुलाखतीमध्ये मांडले आहे, ते पुढे असेही म्हणाले की, शिवसेना सत्ता स्थापनेसाठी परत काही नवीन अटी घेऊन येत आहे, मात्र त्या कोणत्याच अटी आम्हाला मान्य नाहीत.

जेव्हा अमित शहांना शिवसेना आणि त्यांच्यात काय ठरलं होतं असा प्रश्न विचारण्याच आला होता, त्या प्रश्नाला उत्तर देत, आम्ही बंद दाराआड ठरलेल्या गोष्टी सार्वजनिक करत नसल्याचे सांगत, उत्तरदेण्यास टाळाटाळ केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News