तो आवाजावरून सुधारतो इलेक्ट्रिक साधने

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

अमरावती : केवळ एक नजर टाकतो तर लगेच मोटरचा ङ्कॉल्ट ओळखतो, अशी काही काही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणा-या कारागिरांची ख्याती असते. मात्र ज्याला नजरच नाही तो खरचं हे जोखमीचं काम करू शकेल का? असा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण नाहीच म्हणणार, मात्र नवसारी परिसरात नरेंद्र उके नावाचा युवक चक्क नेत्रहीन असतानादेखील इलेक्ट्रिकल मोटर, ङ्क्रीज, पंखा, एअर कंडिशनर दुरुस्त करतो तेही चक्क आवाज ऐकून. 

मूळचा शिदी बुद्रूक येथील रहिवासी असलेल्या नरेंद्रला लहानपणापासून शिक्षणाची जिद्द आहे. मात्र अल्पदृष्टी असल्याने पुस्तक वाचण्यात अडथळा येत होता. डोळ्यांतील रेटिनाचा आजार जडल्याने असलेली अल्पदृष्टी अंधत्वात परिवर्तित झाली. मात्र शिक्षणाची जिद्द कायम असल्याने बहीण शालेय पाठ्यपुस्तक वाचून रेकॉर्ड करून ठेवत असत. मग ती रेकॉर्ड ऐकून मदतनिसाच्या सहकार्याने परीक्षा द्यायची. याच पद्धतीने शिक्षण घेत नरेंद्रने इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात एमए पूर्ण केले, तेसुद्धा  प्रथमश्रेणीत. त्यानंतर बीएड व एमएडसुद्धा शिक्षण घेतले. 

एखाद्या शासकीय सेवेत नोकरी लागावी याकरिता व्यावसायिक पदविकासुद्धा उत्तीर्ण केली. नरेंद्र अंध असून त्याने ब्रेल लिपीचा आधार न घेता हे यश प्राप्त केले.

आपल्या शिक्षणाचा उपयोग करत पथ्रोट येथील एका महाविद्यालयावर चार वर्षे प्राध्यापकी व दोन वर्षे प्राचार्य पद सांभाळले. याचदरम्यान एमसीव्हीसी अंतर्गत इलेक्ट्रिकल विषय शिकवत असताना इलेक्ट्रिक साधने दुरुस्त करण्यासाठी बझरच्या आवाजाच्या साहाय्याने साधने दुरुस्त करायला सुरुवात केली. आता तर एकटे चक्क कुलर, पंखा, पाण्याची मोटर, ङ्क्रीज, एअर कंडिशन व इतर इलेक्ट्रिकल साधने आपल्या अनुभवातून सहज कमी कालावधीत दुरुस्त करतात.

आमचादेखील विश्वास बसत नव्हता... एकदा सहज कार्यालयात असताना अंध व्यक्ती काठी घेऊन इलेक्ट्रिक काम असल्यास मी करून देईल, असे म्हणाला. मात्र अंध व्यक्ती नि मोटर कशी दुरुस्त करणार, यावर विश्वासच बसत नव्हता. मात्र आमच्यासमोर नरेंद्रने मोटरसह पाण्याच्या पाइपची समस्या निकाली काढली, असे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अमरावती विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार अंबादास मोहिते, सहायक रामनाथ मांळूजकर यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News