इंडोनेशियाचं थालीपीठ बनवण्याची हि आहे सोप्पी पद्धत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019

चांगली थालिपिठं

साहित्य...
मिन्स्ड/ ग्राउंड चिकन (खिमा) - १ पाउंड
कांदा - १ मोठा
हिरव्या मिरच्या - ४-५
आले - २इन्च
लसूण - ८-१० पाकळ्या
बटाटे - २ लहान ते मध्यम आकाराचे
अंडं - १
कोथिंबीर - अर्धी वाटी
पुदिना- पाव वाटी
धणे - २ चमचे
जिरे - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा ( शान चा कबाब मसाला मिळतो तोही चालेल)
बेसन - साधारण अर्धी वाटी.
ब्रेड क्रम्स किंवा बारीक रवा - अर्धी वाटी.

कृती: 
चांगली थालिपिठं करण्याचं ठरलं होतं परवा रात्रीच्या जेवणात. पण ऐन भुकेच्या वेळी कुठेतरी एका साइट वर एक रँडम फोटो दिसला - खीमा पॅटिस चा. झालं मग! थालिपीठ क्यान्सल!! आता पॅटिसच करायचे असं डोक्यात घेतलं 

घरी जाता जाता इन्ग्रेडियन्ट्स घेउन गेले. २-३ यूट्युब व्हिडिओ बघितले. मग ऐन वेळी कोणतीही रेसिपी तशी च्या तशी करायची नाही या माझ्या नियमानुसार(!) रीतसर बदल, रीप्लेस्मेन्ट्स करून बनवण्याचा उरका पाडला. फायनल प्रॉडक्ट झक्कासच बनलं एवढं खरं!!

तर कृती अशी:
तयारी - खिमा हळद, मीठ, तिखट घालून थोडा परतून घ्या. खिमा शिजून पाणी निघून गेले पाहिजे. थंड झाल्यावर चॉपर, फूड प्रोसेसर किंवा हाताने तो खिमा एकसारखा कुस्करून घ्या. बटाटेही उकडून मॅश करून बाजूला ठेवा. धणे - जिर्याची भाजून पूड करा. कांदा बारीक चिरून घ्या. आले लसुणाची पेस्ट बहुतेक रेसिपीज मधे असते पण मी आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून न घेता बारीक चॉप करून घेते चॉपर मधे. पेस्ट पेक्षा तुकड्या तुकड्यांचं टेक्स्चर पॅटिस/कबाबात छान लागतं. कोथिंबीर आणि पुदिनाही बारीक चिरून घ्या.

आता खिम्यात धणे जिरे पावडर, गरम मसाला, आले, लसूण मिर्ची, कांदा, चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ ( ते जरा बघूनच घाला कारण आधी खिमा परताताना आपण मीठ घातले आहे) घाला. एक अंडे फोडून घाला. उकडून मॅश केलेले बटाटे घाला. (या दोन्हीमुळे बाइंडिंगसाठी मदत होते). कोथिंबीर, पुदिना घाला. आता थोडे थोडे बेसन घालून सर्व नीट मळून घ्या. काही रेसिपीज मधे सत्तू, कॉर्न फ्लावर असे ऑप्शन आहेत. मी बेसन घरात आहेच आणि वापरायला सोप्पं म्हणून ते वापरलं. बेसन फार जास्त लागत नाही , फायनल प्रॉडक्ट मधे त्याची चव पण लागत नाही पण पॅटिस जरासे फर्म होण्यासाठी ते लागते.

b- एका उथळ पॅन मधे तेल गरम करा. अगदी कमी तेलात नीट नाही होणार असे वाटते. मी डावभर पेक्षा जरा जास्तच तेल वापरलं. मळलेल्या खिम्याच्या गोळ्याचे लहान लहान चपटे लंबगोल पॅटिस बनवा. एका ताटलीत बारीक रवा घेऊन त्यावर पॅटिस हलकेच दोन्ही बाजूने दाबून मग सर्व बाजूने ब्राउन रंग येईपर्यन्त शॅलो फ्राय करा.
पुदिना चटणी, कांद्याच्या स्लाइसेस सोबत सर्व्ह करा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News