आयर्लंड अब दूर नहीं

YIN BUZZ TEAM
Wednesday, 23 January 2019

परवा नवी मुंबई मध्ये राहत असलेल्या मराठवाड्यातील मुलांच्या रूमवर गेलो. सर्व अविवाहित मुले रूमवर राहत असल्यामुळे रूमची अवस्था एखाद्या वस्तीगृहाप्रमाणे झालेली, पादत्राणे एका कोपऱ्यामध्ये पडलेली, किचन मध्ये किचन वट्यावर सामान अस्थाव्यस्त पडलेले, गॅलरीमध्ये दोरीवर काही कपडे ठेवलेले. कपिल, नारायण, सुरज, अरुण, इंद्रजीत अशी सर्व मुले गुण्यागोविंदाने सोबत राहतात.

परवा नवी मुंबई मध्ये राहत असलेल्या मराठवाड्यातील मुलांच्या रूमवर गेलो. सर्व अविवाहित मुले रूमवर राहत असल्यामुळे रूमची अवस्था एखाद्या वस्तीगृहाप्रमाणे झालेली, पादत्राणे एका कोपऱ्यामध्ये पडलेली, किचन मध्ये किचन वट्यावर सामान अस्थाव्यस्त पडलेले, गॅलरीमध्ये दोरीवर काही कपडे ठेवलेले. कपिल, नारायण, सुरज, अरुण, इंद्रजीत अशी सर्व मुले गुण्यागोविंदाने सोबत राहतात.

मी आलो म्हटल्यावर नारायणने लगेच चटई टाकली आणि मी बसलो. थोड्या वेळानंतर  कपिल आला त्याच्याशी गप्पा मारताना तो म्हणाला ' सर मी माझ्या थ्री इन्फोटेक कंपनी चा राजीनामा दिला आणि काल माझा कंपनी मधील शेवटचा दिवस होता आणि येत्या शनिवारी मी एम.एस. करण्यासाठी आयर्लंड ला जातोय'. कपिल चे शब्द ऐकून आनंद झाला आणि त्याचा पूर्ण प्रवास डोळ्यासमोर आला. एकीकडे आम्ही दुष्काळी मराठवाड्यातील मुलं असे म्हणून नशिबाला दोष देणारे मुले मी बघितली तर दुसरीकडे त्याच मराठवाड्यातून शिक्षण घेऊन मराठवाड्याचा झेंडा हातात घेऊन सात समुद्रापार शिक्षणासाठी जाणारी कपिल पाटील आणि अमर पेठकर यांची जोडी.
 
कपिल पाटील म्हणजे उंच पुरा, आधुनिक केसाची शैली, उत्तम बांधा, जणू एखाद्या साऊथ चित्रपटाचा नायकच. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात अंदाजे १००० लोकसंख्या असलेले, निसर्गाच्या  सानिध्यात वसलेले मुलकी हे कपिलचे छोटेसे गाव... कपिलचे वडील शेतकरी पण मुलांना उच्च शिक्षण द्यायचे हा ध्यास मनामध्ये ठेऊन मोठ्या मुलाला तंत्रनिकेतनचे शिक्षण दिले आणि तो सध्या पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये नोकरी करतो. कपिल म्हणजे अभ्यासात हुशार पण त्याचे शिक्षण हे शेतीवर अवलंबून ‘जर शेत पिकेल तर पुढील शिक्षण टिकेल’ अशी अवस्था..

दहावी पर्यंत गावी जिल्हा परिषद मध्ये शिक्षण घेतल्यानंतर ११ वी आणि १२ वी कपिल ने महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर येथून पूर्ण केले. १२ वी चांगल्या गुणाने पास झाल्यानंतर कपिलने मुंबई येथील वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथून इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार (इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन) या शाखेमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. अभियांत्रिकेचे शिक्षण घेताना आलेल्या अनंत अडचणींचा सामना करून विविध स्पर्धेत भाग घेतला. कपिल आणि त्याच्या मित्रांनी बनवलेला सेन्सर रोबोट हा त्याचा आणि त्याच्या महाविद्यालयाचा मानबिंदू ठरला. याच  सेन्सर रोबोट चा पेटंट कपिल आणि त्याच्या मित्रांनी नावावर नोंदणीकृत केला.

अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कपिल ने ‘थ्री इन्फोटेक कंपनी’ मध्ये नोकरी केली आणि स्वतःच्या कमाईवर शिकवणी लावून परदेशात जाण्यासाठी विविध परीक्षेची तयारी करू लागला. ज्याप्रमाणे अर्जुनाला त्याने नेम धरलेल्या धनुष्यबाणासमोर फक्त पक्षाचा डोळा दिसत होता तसा कपिल ला वेध लागले होते ते परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे. आणि तो दिवस उजाडला कपिलला नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड येथे एम.एस.साठी प्रवेश भेटला. कपिल उद्या शनिवारी  आयर्लंडला जातोय त्याचे स्वागत करण्यासाठी अमर पेठकर हा तिथे त्याच महाविद्यालयात शिकत आहे.

अमर पेठकर हा हि मराठवाड्याचाच, एके काळचा कपिलचा रूम सहकारी. 'एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंत' या उक्तीप्रमाणे त्याने कपिलला सर्वोतपरी मार्गदर्शन केले. परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते?, त्याची तयारी कशी करावी?, कोणती पुस्तके अभ्यासावी? अशा विविध प्रश्नांना अमर समाधानपूर्वक उत्तर द्यायचा. अमर पेठकर हा मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंग्याचा. अमरची हि कहाणी कपिलपेक्षा थोडी वेगळी आयर्लंडला जाण्यासाठी मोठा भाऊ प्रशांतने स्वतः कर्ज काढून अमरला परदेशात शिक्षणाला पाठवले.

छोट्या भावाला शिकवतो याचा साधा मनामध्ये लवलेश हि न ठेवता काढलेल्या कर्जाचे निमूटपणे हप्ते भरतो. अमर पेठकरने  सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीरिंग खारघर नवी मुंबई येथून संगणक या शाखेमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर कपिल प्रमाणेच काही दिवस एका कंपनीमध्ये नोकरी केली आणि आज नॅशनल कॉलेज ऑफ आयर्लंड येथे एम.एस.करत आहे.
 
मराठवाड्यातील हे दोघेही तरुण ग्रामीण भागामधून आल्यामुळे  दोघांनाही इंग्रजीची भीती वाटत  होती. इंग्रजीचे गाढे अभ्यासक आणि सध्या एस.आय.इ.एस कॉलेज ऑफ इंजिनीरिंग नेरुळ, नवी मुंबई येथे  इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असणारे  डॉ. रामकिशन भिसे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे अवघड वाटणारी इंग्रजी दोघांनाही सोपी वाटायला लागली.

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातून शिक्षण घेऊन चातक पक्षासारखी भरारी मारणाऱ्या या तरुणांचा आदर्श घेण्यासारखा आहे. त्याचबरोबर त्यांना सर्वोतपरी मदत करणाऱ्या त्यांच्या शेतकरी आई वडिलांचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे हि कौतुक करावे तेवढे कमीच. मुंबईत येऊन या मराठवाड्याच्या मुलांनी अतिशय सचोटीने शिक्षण पूर्ण केले तसेच हे दोघे माझ्या मराठवाड्याचे ‘जय वीरू’ (कपिल आणि अमर ) आयर्लंड येथे मराठवाड्याचेच नव्हे तर भारताचे नाव उज्वल करतील यात शंका नाही. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा!

अन्वर शेख
उप प्राचार्य
न्यू हॉरीझॉन पब्लिक स्कूल न्यू पनवेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News