आयफोनचा डिझायनर 'ॲपल’मधून बाहेर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • इव्ह हे २० वर्षांहून अधिक काळ ‘ॲपल’मध्ये होते.

कॅलिफोर्निया : जगभरात ज्यांच्या मोबाईल फोनने कायम उच्चतम दर्जा राखला, जे फोन प्रतिष्ठेचे प्रतीक बनले अशा ‘ॲपल’ कंपनीचे मुख्य आरेखनकार (डिझायनर) अधिकारी जॉनी इव्ह हे कंपनीतून बाहेर पडणार असल्याचे वृत्त ‘ॲपल’ने एका निवेदनाद्वारे गुरुवारी दिले आहे.

‘आयफोन’ आणि ‘आयमॅक’सब ॲपलच्या अनेक उत्पादनांचे आरेखन इव्ह यांनी केले आहे. आयफोनच्या लोकप्रियतेत त्यांच्या आरेखनांचा मोठा वाटा आहे. या वरूनच इव्ह यांच्या कामगिरीचे महत्त्व लक्षात येते. इव्ह हे २० वर्षांहून अधिक काळ ‘ॲपल’मध्ये होते. त्यांना सर जोनाथन इव्ह या नावानेही ओळखले जाते. ‘इव्ह हे या वर्षाच्या अखेरीस कंपनीचे कर्मचारी नसतील. ते स्वतःची ‘लव्हफॉर्म’ नावाची डिझाइन कंपनी सुरू करणार असून, ‘ॲपल’साठी बाहेरून काम करणार आहेत. त्यांच्या मुख्य ग्राहक कंपनीत ‘ॲपला’ समावेश असू शकेल,’ असे निवेदनात म्हटले आहे.

डिझाइनच्या जगात जॉनी हे एकमेवाद्वितीय आहे. ‘आयमॅक’पासून ‘आयफोन’पर्यंतचे आणि महत्त्वाकांक्षी ‘ॲपल पार्क’च्या योजनेत त्यांनी सर्वस्व पणाला लावले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 
- टीम कुक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲपल

डिझाइनच्या जगात जॉनी हे एकमेवाद्वितीय आहे. ‘आयमॅक’पासून ‘आयफोन’पर्यंतचे आणि महत्त्वाकांक्षी ‘ॲपल पार्क’च्या योजनेत त्यांनी सर्वस्व पणाला लावले, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही. 
- टीम कुक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲपल

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News