राष्ट्रवादीकडून विधानसभा इच्छुकांच्या मुलाखती

उमेश वाघमारे
Wednesday, 24 July 2019
  • बदनापुर, भोकरदन मतदार संघातून प्रत्येकी पाच जण इच्छुक
  • परतूर-मंठा विधानसभा मतदार संघातून कपिल आकात यांच्याकडून तिकिटाची मागणी

जालना: विधानसभा निवडणुकीचे वारे आता वाहण्यास सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्ह्यातील पाच ही विधानसभा मतदार संघासाठी बुधवारी (ता. 24) हॉटेल बगडिया येथे इच्छुकांच्या तीन सदस्य समितीकडून मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यावेळी भोकरदन-जाफराबाद व बदनापुर मतदार संघातून प्रत्येक पाच जणांनी विधानसभेसाठी तिकीटाची मागणी केली आहे. तर घनसावंगी विधानसभा मतदार संघातून आमदार राजेश टोपे व परतूर-मंठा विधानसभा मतदार संघातून कपिल आकात यांनी तिकिटाची मागणी केली आहे. 

जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघाच्या इच्छुक उमेदवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजीया खान, डॉ. नरेंद्र काळे, भास्करराव काळे या तीन सदस्य समितीने या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी आमदार राजेश टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळीकर,  माजी आमदार अरविंद चव्हाण, बाळीराम कडपे, रवींद्र तौर, संजय काळवंडे आदीची उपस्थिती होती.

यावेळी जालना विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे जालना शहराध्यक्ष नंदकुमार जांगडे, महिला शहराध्यक्ष साजिया शेख, रवींद्र तौर यांनी मुलाखती दिल्या. तर बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघातून बबलू चौधरी, भागवान शिंदे, शरद आरागडे, सुरेश खंडाळे, हर्षकुमार गायकवाड या पाच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
 
तर भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दानवे, केशव जंजाळ, लक्ष्मीण दळवी, अब्ब्दुल सत्तार अब्ब्दुल रज्जाक आणि श्रीरंगराव जंजाळ या पाच इच्छुकांनी मुलाखती दिल्या. 

तर घनसावंगी विधानसभा मतदार संघातून आमदार राजेश टोपे व परतूर-मंठा विधानसभा मतदार संघातून कपिल आकात यांनी मुलाखीत दिल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी दिली.  दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाच ही विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची तयार असल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची आघाडी आहे, त्यामुळे विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवार नाही. तसेच विधानसभेसाठी जागा वाटपात जागांची अदलाबदली झाल्यास त्याची तयारी ही ठेवण्यात आली आहे.
 
-डॉ. निसार देशमुख, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, जालना.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News