विद्यार्थ्यांचा अकरावीत सीबीएसईकडेच कल: अंतर्गत मूल्यमापनाचा फटका

मंगेश गोमासे
Saturday, 15 June 2019
  • राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून बारावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे वीस गुण काढून घेण्याचे ठरविले. 
  •  याचा फटका राज्य शिक्षण मंडळाला यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

नागपूर: राज्य शिक्षण मंडळाने यावर्षीपासून बारावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनाचे वीस गुण काढून घेण्याचे ठरविले. याउलट केंद्रीय माध्यमिक शिक्षण विभागाने यावर्षीपासून बारावीत गणित, इंग्रजी आणि हिन्दी विषयात अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्याचे ठरविले. त्यामुळे सीबीएसई दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थी राज्य शिक्षण मंडळाकडे पाठ फिरवित अकरावीमध्येही सीबीएसईमध्येच प्रवेश घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, याचा फटका राज्य शिक्षण मंडळाला यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत बसणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

राज्य मंडळाचा बारावीचा निकालात यावर्षी पाच टक्‍क्‍यांची घट झाली. त्यामुळे 90 टक्‍याहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही कमालीची घट झाल्याचे दिसून आले. दरवर्षी सीबीएसई अभ्यासक्रमात बारावीमध्ये अंतर्गत मूल्यमापनासाठी गुण मिळत नसल्याच्या कारणाने बरेच विद्यार्थी अइंग्रजीची कृतिपत्रिका आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये झालेल्या बदलामुळे भ्रमाचा भोपळा फुटला आणि निकालात लक्षणिय घट झाली. त्याचा फटका सर्वाधिक सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना बसला. दुसरीकडे सीबीएसईद्वारे यावर्षीपासून गणित, इंग्रजी आणि हिन्दीसारख्या विषयात अंतर्गत मूल्यमापन करुन गुणदान करणार आहे.

याता प्रामुख्याने इंग्रजी आणि हिन्दीमध्ये स्पीकिंग नॉलेज आणि गणितामध्ये प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. यापूर्वी फिजिक्‍स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी विषयाचेच प्रात्यक्षिक होत असत. त्यामुळे याचा फायदा लक्षात घेत, यंदा पालकांनीही याबद्दल विचार बदलला असून राज्य शिक्षण मंडळाकडे पाठ फिरवित पाल्यांना सीबीएसईच प्रवेश दिला आहे. त्यामुळे जवळपास सीबीएसईची बहुतांश महाविद्यालये हाऊसफुल्ल झाली असल्याचे चित्र आहे. 

दरम्यान यासंदर्भात नामवंत सीबीएसई शाळेच्या प्राचार्यांना विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा देत, सीबीएसईद्वारे यावर्षीपासून इंग्रजी, गणित आणि हिन्दी विषयात इटरर्नल मार्क देण्यात येणार आहे. जवळपास त्यातून वीस गुणासाठी विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक आणि अतर्गत मूल्यमापन केल्या जाणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्‍चित होईल असे स्पष्ट केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News