कोकण कृषी विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा संपन्न

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील तिसऱ्या सत्रातील विजेत्या संघांना कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत गौरविले.

दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयांच्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील तिसऱ्या सत्रातील विजेत्या संघांना कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या उपस्थितीत गौरविले. शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, संचालक विठ्ठल नाईक,  सहयोगी अधिष्ठाता यशवंत खंडेतोड व एम. सी. कस्तुरे आदी उपस्थित होते. स्पोर्टेक्‍स २०१९ मध्ये एकूण २७ महाविद्यालयांमधील सुमारे ७४५ विद्यार्थी,२८२ विद्यार्थिनी, ४३ संघ व्यवस्थापक व ३० पंच यांनी कबड्डी, खो-खो आणि बास्केटबॉल, या ३ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविला.

या स्पर्धांचा निकाल विजेता-उपविजेता या क्रमाने असा : कबड्डी (पुरुष)- विजेता- शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय (खरवते), उपविजेता- कृषी महाविद्यालय (महाड). महिला- शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय (खरवते), उपविजेता- उद्यानविद्या महाविद्यालय (मुळदे). खो-खो- पुरुष- कृषी महाविद्यालय (सांगुळवाडी), अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय (सरळगांव, ठाणे). महिला- कृषी महाविद्यालय (दापोली), कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय (दापोली). बास्केटबॉल (पुरुष)- कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय (दापोली), कृषी महाविद्यालय (दापोली). महिला- कृषी महाविद्यालय (दापोली), शरदचंद्रजी पवार अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय (खरवते). 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News