ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधी पक्षांना टोला

सकाळ वृत्तसेवा(यिनबझ)
Friday, 2 August 2019

वर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. ‘मतदानाकरिता ईव्हीएचा वापर व्हायला लागल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशात आणि विविध राज्यांमध्ये १० वर्षे सत्ता भोगली. त्यामुळे या मुद्द्यात तथ्य नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन यापूर्वी केलेल्या चुकांची माफी मागावी व सहानुभूती मिळवावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. दोन) येथे लगावला. 

वर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. ‘मतदानाकरिता ईव्हीएचा वापर व्हायला लागल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशात आणि विविध राज्यांमध्ये १० वर्षे सत्ता भोगली. त्यामुळे या मुद्द्यात तथ्य नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन यापूर्वी केलेल्या चुकांची माफी मागावी व सहानुभूती मिळवावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. दोन) येथे लगावला. 

भाजपच्या ‘महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्यात आले असता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, विधान परिषदेचे सदस्य सुरजितसिंग ठाकूर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षे दुष्काळमुक्तीसाठी खर्ची घालणार आहे. सिंचनाकरिता आम्ही भरघोस गुंतवणूक केली आहे. विदर्भातील एकही सिंचन प्रकल्प असा नाही, ज्याचे काम सुरू नाही किंवा निधी नाही. तेलंगणातील वाहून जाणारे पाणी ‘महाराष्ट्रात ४८० किलोमीटरपर्यंत आणण्यात येईल. त्यापैकी १०० टीएमसी पाणी पूर्व व पश्चिम‘ विदर्भातील प्रत्येकी चार जिल्ह्यांकरिता, तर १६७ टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडून उत्तर ‘महाराष्ट्राकरिता उपयोगात आणले जाईल.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘महाराष्ट्रातील ८९ औद्योगिक प्रकल्पांकरिता २० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गुरुकुंज (मोझरी) येथून ‘महाजनादेश यात्रेला सुरुवात केल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राष्ट्रसंतांच्या समाधिस्थळी अधिक कामे‘ करण्याची प्रेरणा ‘मिळाली.

भाजपची संघर्षाची परंपरा आहे. आता सत्तेत असताना संवाद यात्रेद्वारे जनतेसमोर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत आहोत. पक्षाने उत्तरदायित्वाची शिकवण दिलीय, ती आम्ही पाळतोय. सर्व समस्या संपल्या, जनता सुखी आहे, असा माझा दावा नाही; पण २०१४ च्या आणि आताच्या परिस्थितीत भरपूर सुधारणा झाली आहे.   

‘आम्ही पक्षातच राहू
सध्या काही पक्षांमध्ये कुणी राहायला तयार नाही. काही पक्षांम‘ध्ये तर ‘आम्ही पक्षातच राहू, अशी शपथ घेतली जात आहे. आमची ‘मेघा भरती नाही, छोटी भरती आहे. ती बंद झालेली नाही; पण आमच्याकडे लिमिटेड जागा आहेत. विदर्भातही इच्छुक अनेक आहेत; मात्र, सर्वांना घेणार नाही. सध्या ‘महाराष्ट्रात युतीला जे समर्थन मिळत आहे, ते पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळेल, अशी खात्री असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News