‘आर्टिकल १५’ साठी पोलिसांकडून घेतली प्रेरणा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

‘आर्टिकल १५’  चित्रपटात आयुष्मान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

अभिनेता आयुष्मान खुरानाचे ‘अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ हे चित्रपट चांगलेच गाजले. या चित्रपटांनंतर त्याच्या ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाची फार चर्चा सुरू होती. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला.

या चित्रपटात आयुष्मान एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्यासाठी त्याने अनेक पोलिस अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेतली आहे. त्याने दिल्ली आणि कोलकाता येथील पोलिस अधिकाऱ्यांना भेटून त्यांचं वागणं-बोलणं समजून घेतले.

तसेच ते कशाप्रकारे सलाम करतात हे सगळं जवळून बघितले आणि त्यांचे निरीक्षण केले. याबाबत आयुष्मान सांगतो, ‘मी या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्यासाठी अनेक पोलिसांची प्रेरणा घेतली.

मी त्यांचे व्यवस्थित निरीक्षण केले. यासाठी मी माझे एक पोलिस मित्र वरिष्ठ पोलिस अधिकारी मनोज मालवीय यांना भेटलो.’
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News