अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशाची होणार तपासणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • अकरावी प्रवेश - शिक्षण विभागाकडून भरारी पथकाची स्थापना 
     

नागपूर - केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. 27 जूनपर्यंत समितीमार्फत द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेश पूर्ण करण्यात आली. मात्र, यादरम्यान अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या महाविद्यालयांनी खरोखरच अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश दिले आहे काय? याची तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उसपंचालकांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय भरारी पथकाची स्थापना केली आहे. शुक्रवारपासून हे पथक महाविद्यालयांतील अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशाची तपासणी करणार आहे. 

महाविद्यालयांकडून अकरावी प्रवेश करताना 51 टक्के विद्यार्थी हे ज्या धर्माच्या व भाषेच्या आधारावर अल्पसंख्यांक दर्जा घेतला आहे, त्याच धर्मातील वा भाषेचा मुलांचा समावेश करावा लागतो. यानुसार शहरात ख्रिश्‍चन, सिंधी, मुस्लीम, हि धर्माच्या व भाषेच्या आधारावर काही महाविद्यालयांनी हा दर्जा मिळविला आहे. त्यानुसार या महाविद्यालयांना सुविधाही मिळते. मात्र, प्रवेशावेळी या महाविद्यालयांकडून अल्पसंख्यांकांसाठी असलेला 51 टक्के कोटा सरेंडर केल्या जातो. त्यामुळे सामान्य विद्यार्थ्यांनाही त्यात प्रवेश मिळतो. तेव्हा सुविधा अल्पसंख्यांक दर्जाचा घेत, प्रवेश सामान्य विद्यार्थ्यांचे घेण्यात येत असल्याचे सध्या चित्र आहे.

याच प्रकाराने बऱ्याच महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळत नसल्याचे समजते. यावर काही संस्थाचालकांनी आक्षेपही नोंदविला आहे. या आक्षेपातूनच आता अल्पसंख्यांक कोट्याच्या नावाखाली सामान्य विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणाऱ्या शहरातील जवळपास वीस कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करण्यात येईल. यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीती उपसंचालक अध्यक्ष असून केंद्रीय प्रवेश समितीचे दोन सदस्य, अल्पसंख्यांक कनिष्ठ महाविद्यालयातील एक शिक्षक आणि प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य राहणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News