नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्राने होणार विद्यार्थी विज्ञानवादी

समीर मगरे
Sunday, 14 July 2019

जिल्ह्यातील ३० शाळांना साहित्य वाटप, विविध प्रकारच्या ५०२ साहित्यांचा समावेश

प्राथमिक शिक्षण परिषद समग्र शिक्षाच्या वतीने जिल्ह्यातील नगर पालिका, जिल्हा परिषदांच्या मिळून ३० शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र स्थापन करण्यात आले. या केंद्रात विविध प्रकारचे तब्बल ५०२ साहित्य आहेत. या साहित्यातून नगर पालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी विज्ञानवादी होण्यास मदत मिळणार आहे. 

जिल्ह्यातील नगर पालिका, जिल्हा परिषदांमधील विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा राहावा. तसेच सृजनशील कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान, गणित विषय आवडावे, विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, नगर पालिकेच्या शाळांतून विविध प्रकारचे शिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे शासकीय योजनासुद्धा मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. या योजनांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आदी देण्यात येते. तर विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव मिळावा, ह्या उद्देशाने समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र देण्यात येत आहे. या माध्यमातून सन २०१८-१९ मध्ये २८ केंद्र जिल्ह्यात स्थापन झाले आहे. तर यंदा ३० नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र मंजूर झाले असून, प्रत्येक तालुक्यात दोन प्रमाणे नगर पालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थापन करण्यात आले आहे. या विज्ञान केंद्रातमध्ये ईलेक्ट्रीक मॉडल्स, चार्ट, माहित किट तक्ते यासह इतरही साहित्य वाटप करण्यात आले आहे. मागिल वर्षी मे. सारथी इंड्रस्ट्रीजच्या माध्यमातून साहित्य वाटप करण्यात आले होते. तर यंदा मे. क्यूरीऑन एज्यूकेशन, ठाणे यांच्याकडून साहित्य देण्यात आले. सध्या तालुक्यात साधारणत: तीन ते चार प्रमाणे एकूण ५८ नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र मराठी तसेच ऊर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू आहे. त्यामुळे त्या विज्ञान केंद्राच्या आजुबाजुच्या शाळांतील विद्यार्थ्यांनासुद्धा विज्ञान केंद्राचा लाभ होणार आहे. एकंदरीत नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रामुळे जिल्हा परिषद, नगर पालिकेतील विद्यार्थी नक्किच विज्ञानवादी होणार ह्यात दुमतच नाही.

पथकाकडून होते नियमित तपासणी
नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रात नियमित विद्यार्थ्यांना अध्ययन केल्या जाते. ह्याची शहानिशा करण्याच्या दृष्टीने समग्र शिक्षाकडून एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाच्या माध्यमातून विज्ञान केंद्राची नियमित तपसणी केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे नगर पालिका, जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यां व्यतीरीक्त खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा विज्ञान केंद्र पाहणी करता येणा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News