कुडाळात सेवानिवृत्त शिक्षकांवर असा होतोय अन्याय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019

कुडाळ - येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे सेवानिवृत्त शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे पेन्शन अदालतमध्ये उघड झाले. तालुक्‍यात १८० निवडश्रेणी मंजूर झालेल्या एकाही शिक्षकाला ७ महिन्यांत लाभ देण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी चंद्रकांत अणावकर यांनी दिली.

कुडाळ - येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाच्या अकार्यक्षम कारभारामुळे सेवानिवृत्त शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे पेन्शन अदालतमध्ये उघड झाले. तालुक्‍यात १८० निवडश्रेणी मंजूर झालेल्या एकाही शिक्षकाला ७ महिन्यांत लाभ देण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी चंद्रकांत अणावकर यांनी दिली.

जिल्‍हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाच्या गलथान व अकार्यक्षम कारभारामुळे ३१ डिसेंबर २०१५ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळू शकलेला नाही. ४ एप्रिल २०१८ च्या आदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुक्‍यातील ज्या १८० शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर केल्या, त्यापैकी एकाही शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ शिक्षण विभागाने आजपर्यंत दिलेला नाही. शिक्षण विभाग प्रशासनाच्या या कारभाराबद्दल पेन्शन अदालतीमध्येच नाराजी व्यक्त करण्यात आली.

१७ जुलैला कुडाळ तालुका त्रैमासिक पेन्शन अदालत पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी आयोजित केली होती; पण तेच अदालतमध्ये अदालतला संपता संपता आले. तरीही उशिराने पेन्शन अदालत अधीक्षक कदम व सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई यांनी अदालत कामकाज चालवले. यावेळी गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे उपस्थित होते. १ जानेवारी २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ का दिला नाही. यावर कोणीही अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत; मात्र ३१ जुलैपर्यंत २१ शिक्षक व पाच कर्मचारी मिळून २६ सेवानिवृतांना लाभ देण्याचे मान्य केले. सातव्या वेतन वेतन आयोगानुसार वेतन पुनर्रचना केली त्या सर्वांना पुनर्रचित वेतनाची ३६ महिन्याचे वेतन फरकाची स्टेटमेंट द्यावी, अशी मागणी केली. ती मान्य करण्यात आली. सेवानिवृत्त संघटनेचे पदाधिकारी उदय कुडाळकर, चंद्रकांत अणावकर, शरद कांबळे, अशोक रासम, भरत आवळे, घनश्‍याम वालावलकर यांनी सेवानिवृत्तांच्या प्रश्‍नावर चर्चा घडवून आणली.

लाभ न दिल्‍याचे केले मान्‍य
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत जे शिक्षक सेवानिवृत्त झाले त्यांची सुधारित दराने पेन्शन पुनर्रचना करून त्यांना लाभ द्यायचा होता. त्यापैकी एकाही शिक्षकाला दिलेला नाही, हे अदालतमध्ये चर्चेला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी सूर्यभान गोडे यांनी मान्य केले आहे.

९७ शिक्षकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी...
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ४ डिसेंबर २०१८ च्या आदेशाने निवड श्रेणी मंजूर केलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या आठ याद्या मंजूर केल्या. वैभववाडी ६६, कणकवली १६७, देवगड २००, कुडाळ १८०, मालवण १८२, वेंगुर्ले १९६, सावंतवाडी व दोडामार्ग मिळून १९५ अशा एकूण ११८६ सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर केली. कुडाळ तालुक्‍यातील १८० पैकी एकाही शिक्षकाला गेल्या सात महिन्यात लाभ दिलेला नाही. ९७ शिक्षकांचे प्रस्ताव तपासून मंजुरी मिळण्यासाठी जिल्हा वित्त व लेखा विभागाचे पाठवल्याचे गोडे यांनी पेन्शन अदालतीत सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News