नर्सरीच्या चिमुकलीस शिक्षिकेची अमानुष मारहाण 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • सेंट अ‍ॅनिस नर्सरी स्कूल येथील घटना; सोशल मीडीयातून प्रकार उजेडात, शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी

वरोरा: गृहपाठ बरोबर करीत नसल्याने शिक्षिकेने चिडून जावून नर्सरीतील एका चिमकलीस अमानुषपणे मारहाण केली. सोशल मीडीयातून हा प्रकार समोर आल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. त्या शिक्षिकेला निलंबित करण्याची मागणी पालकांनी केली आहे. याच संस्थेत चार महीन्यांपूर्वी शिक्षिकेच्या उपस्थितीत वर्गात विद्यार्थ्यांकडून पेनहुक्का करण्याचा प्रकार घडला होता.
 
१५ जुलै सकाळी सेंट अ‍ॅनिस नर्सरीतील मुलांना शिक्षिका वृषाली गोंडे इंग्रजीत शिकवीत होत्या. शिकवत असतांना मुलिचे लक्ष बाईकडे नव्हते. त्यांच्याकडून लक्षपूर्वक अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न शिक्षिकेने केला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. शेवटी शिक्षिकेचा पारा भडकला. बाजूला ठेवून असलेल्या छडीने एका चिमुकलीच्या पाठीवर मारण्यास तिने सुरुवात केली. या वेदनेने मुलगी किचाळत होती. हा प्रकार बघून नर्सरीतील सगळी मुले स्तब्ध राहून निमुटपणे बघत राहिली. 

घडलेला हा प्रकार मुलीने आपल्या आई-वडिलांना घरी येऊन सांगितला. प्रथदर्शनी आपल्या मुलीला काहीच न आल्याने शिक्षिकेने मारले असावे, असे पालकांना वाटले. मात्र, जेव्हा तिच्या पाठीवर उमटलेले व्रण पाहून पालकांना धक्का बसला. हा सगळा प्रकार त्यांनी वॉर्डातील एका राजकीय पक्षाच्या आपल्या जवळच्या मित्रांना सांगितला. मित्र चौकशीसाठी पोहोचले. तेव्हा शिक्षिकेने झालेल्या प्रकाराची माफी मागितली. आपल्या मुलीला याच शाळेत पुढील शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे शिक्षिकेशी व संस्थेशी पंगा नको, या विचाराने त्यांनी नमते घेतले. मुलगी त्या शिक्षिकेच्या हाताखाली शिकणार नाही. तिला वर्ग बदलून हवा, ही अट घालून त्यांनी सशर्त माघार घेतली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता पालकांनी शिक्षिकेला तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. 

शिक्षिकेला नोटीस
याबाबत मुख्याध्यापिका ब्लेसी यांना विचारणा केली असता त्यांनी संबंधित शिक्षिकेला नोटीस बजावल्याचे सांगितले. यापुढे मुलांना मारहाण होण्याची घटना घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्या मुलीला दुस-या तुकडीत स्थानांतरण करण्यात येईल. यापुढे वर्गात छडीचा वापर करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News