#INDvBAN अभ्यास केला कोहलीचा; पेपर आला रोहित शर्माचा, सगळ्यांना बदडवलं!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 3 July 2019
  • विश्‍वकरंडक स्पर्धेत चौथे शतक रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत चौथे शतक झळकाविण्याची कामगिरी केली.

बर्मिंगहॅम - विश्‍वकरंडक स्पर्धेत चौथे शतक रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत चौथे शतक झळकाविण्याची कामगिरी केली. यापूर्वी अशी कामगिरी केवळ श्रीलंकेच्या कुमार संगकाराने 2015मधील स्पर्धेत केली होती. कारकिर्दीत रोहितचे विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील हे पाचवे शतक ठरले. रोहितने पंधरा डावातच ही कामगिरी केली. यापूर्वी संगाकाराने 35, पॉंटिंगने 42 डावांत पाच शतके ठोकली आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक सहा शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. 

सर्वाधिक धावांमध्ये आघाडीवर 

रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी करून यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत 544 धावा केल्या. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला (516) मागे टाकून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीचे स्थान मिळविले. 

दहावा फलंदाज 

एका विश्‍वकरंडक स्पर्धेत पाचशेहून अधिक धावा करणारा रोहित शर्मा दहावा फलंदाज ठरला. एका स्पर्धेत सर्वाधिक 673 धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (2003) नावावर आहे. त्यानंतर मॅथ्यू हेडन 659 (2007), माहेला जयवर्धने 548 (2007), मार्टिन गुप्टिल 547 (2015), कुमार संगकारा 541 (2015), रिकी पॉंटिंग 539 (2007), सचिन तेंडुलकर 523 (1996), डेव्हिड वॉर्नर 516 (2019), ऍरॉन फिंच 504 (2019), तिलकरत्ने दिल्शान (2011) या अन्य फलंदाजांचा समावेश आहे. 

यंदाच्या स्पर्धेत चौथी शतकी सलामी 

रोहित शर्माने यंदाच्या स्पर्धेत चौथी शतकी सलामी दिली. यापूर्वी, त्याने राहुलच्या साथीत दोन आणि शिखर धवनच्या साथीत दोन शतकी भागीदारी केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध त्याने राहुलबरोबर 180 धावांची सलामी दिली. 

सर्वाधिक षटकार 

रोहित शर्माने आजच्या विक्रमात षटकारांनाही ओढले. भारताकडून सर्वाधिक 360 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केले. या विक्रमात त्याने महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. त्याचबरोबर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 229 षटकार ठोकताना धोनीलाच (228) मागे टाकले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News