काश्‍मीरचा दर्जा काढल्याने भारत-पाक संबंध अजून चिघळणार : इम्रान खान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

काश्‍मीरचा दर्जा काढून घेणे हे बेकायदा असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचे उल्लंघन असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले.

इस्लामाबाद : "जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटविण्याचा भारताचा निर्णय अवैध असून, यामुळे अण्वस्त्रसज्ज असलेल्या भारत-पाकिस्तान या शेजारी देशांमधील संबंध अजून बिघडतील,’’ अशा शब्दांत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा निषेध केला. काश्‍मीरचा दर्जा काढून घेणे हे बेकायदा असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाचे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले.

ट्रम्प यांना मध्यस्थीचे आवाहन
जम्मू-काश्‍मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करण्यात येत असल्याने पाकिस्तानला चिंतेने घेरले असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.

इम्रान खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की ट्रम्प यांनी काश्‍मीर मुद्यावर मध्यस्थी करण्याची वेळ आली आहे. कारण काश्‍मीरमधील परिस्थिती नाजूक बनत असून, नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कर आक्रमक पाऊल उचलत आहे. यामुळे या भागावर संकट येण्याचे चिन्ह दिसत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News