भारताचा स्वातंत्र्यदिन पाकिस्तानातही साजरा, भारतात सहभागी करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच,  आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन केले.

इस्लामाबाद : भारताचा स्वातंत्र्यदिन पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्येही ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देतानाच,  आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन केले.

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा भारताचा निर्णय आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्यात पाकिस्तानचे सुरू असलेले प्रयत्न, तसेच त्यात त्या देशाला येत असलेल्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर बलुचिस्तानमधील नागरिकांनी हे आवाहन केले. आम्ही भारताशी जोडले गेलेलो असून पाकिस्तानच्या जोखडातून बलुचिस्तानला स्वतंत्र करायचे आहे. त्यामुळे भारताने मदत करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

बलुचिस्तान भारताशी जोडला गेला आहे आणि आम्हाला मदत हवी आहे, अशी मागणी बलुचिस्तान स्वतंत्र चळवळीचे कार्यकर्ते अत्ता बलोच यांनी केली; तर भारताने सर्व जागतिक व्यासपीठावर स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोमाने मांडावी, अशी मागणी याच चळवळीत काम करणारे अश्रफ शेरजान यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News