भारताचे दावे सत्य; मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद अटकेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईद असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते.
  • मात्र त्याविरोधात पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.​

लाहोर : २००८ साली मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणलेला मास्टरमाईंड हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तनमध्ये अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान माध्यमांनी हा दावा करून याबाबतचे वृत्त दिले आहे. लाहोर येथे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती पाकिस्तान मीडियाने दिली आहे.  

भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे हाफिज सईद असल्याचे अनेक पुरावे भारताने दिले होते. मात्र त्याविरोधात पाकिस्तानकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.  मात्र आता त्याला अटक करण्यात आली असून भारताने केलेले दावे सत्य असल्याच समोर आलं आहे. 

यापूर्वी भारतात झालेले अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणण्यात हाफिज सईदच होता, हे यापूर्वीच भारताने स्पष्ट केले असून भारताच्या दाव्यांना यश मिळाले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News