भारताचा मोठा विजय; कुलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती कायम; मित्र आणि कुटुंबियांची देवाकडे प्रार्थना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • या सुनावणी दरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपल्या-आपल्या बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडल्या.
  • या खटल्यावर सुनावणी पूर्ण झाल्यावर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे.

हेग : भारताचे माजी नौदल लष्कर अधिकारी  कुलभूषण जाधव यांच्या सुटकेबाबत भारताला आशेचा किरण दिसू लागला आहे. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना भारताचा गुप्तहेर म्हणून पाकिस्तानने अटक केली आणि त्यानंतर पाकिस्तान सैन्य न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेल्या या शिक्षेच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. पाकिस्तान सैन्य न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ)ने स्थगिती दिली आहे. हा भारताचा मोठा विजय मानला जात असून कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळाला आहे.  

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक करुन फाशीची शिक्षा सुनावल्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. भारताने म्हटलं होतं की, कुलभूषण जाधव यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली. जाधव यांना अटक केल्याची माहिती सुद्धा पाकिस्तानने भारताला उशीरा कळवली. तसेच कुलभूषण जाधव यांना आपली बाजू मांडण्यासाठी कायदेशीर मदत देण्यास नकार दिला. यासोबतच जाधव यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटण्यासही पाकिस्तानने नकार दिला होता.

मात्र आंतरराष्ट्रीय कोर्टाने पाकिस्तानचे दावे फेटाळले आहेत.  त्यानंतर या खटल्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालात दीर्घकाळ सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपल्या-आपल्या बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडल्या. या खटल्यावर सुनावणी पूर्ण झाल्यावर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निर्णय सुनावला आहे. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडली आहे. 

भारताच्या याचिकेनंतर आयसीजेने मे २०१७ मध्ये जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. याप्रकरणात १८ फेब्रुवारी २०१९ ला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी ‘आयसीजे’ समोर आपली बाजू मांडल्यानंतर ‘आयसीजे’ने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता. या प्रकरणातील अंतिम निर्णय कोर्ट आज देणार आहे. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद यूसुफ या निकालाची सुनावणी करणार आहेत.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News