विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ अखेर जाहीर, युवा खेळाडूंना संधी

सकाळ (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे
  • चहर बंधू, कृणाल पंड्या यांची टी-20 संघात समावेश
  • शुभमन गिलचा या संघात विचार केला नाही

मुंबई : महेंद्रसिंह धोनीची वेस्ट इंडीज दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली असून, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, नवदीप सैनी यांचा वनडे, तर चहर बंधू, कृणाल पंड्या यांची टी-20 संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटीसाठी अनुभवाला प्राधान्य देण्यात आले आहे. 

मुुंबईत झालेल्या निवड समिती बैठकीत संघनिवड करण्यात आली. कोलमडत्या मधल्या फळीस स्थैर्य देण्याचा प्रयत्न या संघनिवडीतून करण्यात आला आहे. मधल्या फळीत श्रेयस, मनीष, केदार यांना स्थान देण्यात आले आहे. 

धोनीच्या माघारीमुळे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली. कसोटीत त्याच्याजोडीला वृद्धिमान साहा असणार आहे. विश्वकरंडक ट्‌वेंटी 20 स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीत होणार आहे. त्या दृष्टीने संघ उभारणी करणे, हे निवड समितीचे लक्ष्य आहे. त्यामुळेच अनेक युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. यामध्ये कृणाल पंड्या, राहुल व दीपक चहर नवदीप सैनी, खलील अहमद यांचा समावेश आहे. 

शिखर धवनने वनडे व टी-20 संघात पुनरागमन केले आहे. तर, कसोटी संघात अश्विनने पुनरागमन केले आहे. शुभमन गिलचा या संघात विचार केलेला दिसत नाही. सलामीवीर रोहित शर्माला तिन्ही प्रकारच्या संघात स्थान देण्यात आले आहे.के. एल. राहुललाही अजून संधी दिली आहे. पृथ्वी शॉच्या तंदुरुस्तीमुळे त्याला कसोटी संघापासून दूर ठेवण्यात आले आहे. 

जसप्रीत बुमराला कसोटी संघात घेण्यात आले तर, महंमद शमीला वनडे आणि कसोटी संघात खेळविण्यात आले आहे. आयपीएलपाठोपाठ अ दौऱ्यात यशस्वी होत असलेला खलील अहमद, दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे संघात असतील. 

भारतीय संघ कसोटीसाठी :
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयांक अगरवाल, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

भारतीय संघ वनडेसाठी :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

भारतीय संघ टी-20साठी :
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News