क्रिकेटचा कर्णधार पंचतारांकीत हॉटेल्समध्ये आणि दारिद्र्य रेषेमुळे भारतातील फुटबॉल कर्णधार अजूनही झोपडपट्टीत

आरती औटी, यिनबझ
Thursday, 27 June 2019

विराट सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणून ओळखला जात आहे, मात्र दुसरीकडे असाच विश्वविक्रम करून देशाचं नाव सर्वोत्तम पातळीवर उंचावणारी खेळाडू मात्र आज अशाच साऱ्या सोईसुविधांपासून वंचित आहे.

जगातील एक नंबरचा फलंदाज आणि आपल्या क्रिकेटशैलीमुळे प्रसिद्ध असणारा भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची हायफाय जिवनशैली जवळजवळ सगळ्यांनाच माहित असेल, भारतातच नाही तर परदेशातही आपले चाहते बनवणारा विराट कोहली नेहमीच चर्चेचा विषय असतो. धावांची खेळी आणि सर्व प्रकारचे शॉट खेळण्याची कला यासाठी प्रसिध्द असणार विराट सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणून ओळखला जात आहे, मात्र दुसरीकडे असाच विश्वविक्रम करून देशाचं नाव सर्वोत्तम पातळीवर उंचावणारी खेळाडू मात्र आज अशाच साऱ्या सोईसुविधांपासून वंचित आहे.

क्रिकेट हा पाश्चिमात्य खेळ असूनही आपल्या देशात सगळ्यात जास्त चाहते कोणत्या खेळाचे असतील तर ते क्रिकेटचे. त्यामुळे भारतात खेळले जाणारे अनेक खेळ व त्या खेळांच्या खेळाडूंकडे दुर्लक्ष होताना आपल्याला दिसते. जरी ते खेळाडू श्रीमंत नसले तरी त्यांनी भारताला अनेक गौरव मिळवून दिलेत, हे नक्की. असेच काही झाले भारतीय फुटबॉल संघाची कर्णधार सोनी कुमारी हिच्यासोबत. 

2013 मध्ये आशियाई फुटबॉल कॉन्फरडरेशन टूर्नामेंट जिंकणाऱ्या अंडर 14 संघातील भारतीय महिला संघाची एक मुख्य खेळाडू म्हणजे सोनी कुमारी. अंडर -14 फुटबॉल संघाची कर्णधार बनून देशाचं नेतृत्व करणारी सोनी सध्या भारत सरकारकडून तसेच क्रिडा क्षेत्राकडून मिळणाऱ्या हरएक सुविधांपासून उपेक्षित असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. 

बिहारमध्ये असलेल्या पश्चिम चंपारण जिल्हातील काही समाज आजही आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि सोनी कुमारीदेखील त्याच भागात राहाते. या हालाखीच्या परिस्थितीत आपल्याला आवड असलेल्या खेळाचे प्रशिक्षण घेणे खरोखरच सोपे नसते. घरी एक वेळची खायची पंचायत, तरीही सर्व अडचणींना तोंड देत सोनी फक्त भारतासाठी खेळत राहिली. तरुण फुटबॉलपटू सोनी अद्यापही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे, मात्र तिच्या दारिद्र्य रेषेखालील परिस्थितीतून पूढे येण्यासाठी कोणीच प्रतिनिधीत्व करताना दिसत नाही. 

अजूनपर्यंत युनिसेफने सोनी हिला सन्मानित केले. तिचे अनेक गौरवही करण्यात आले, परंतु सोनीची आर्थिक परिस्थिती जैशे थेच. विराट कोहली जसा भारतासाठी खेळतो अगदी त्याचप्रकारे सोनी कुमारीही भारतासाठी खेळते; पण त्या दोघांच्या आर्थिक परस्थितीत जमिन आसमानचा फरक आहे, हे नक्की. त्यामुळे देशाच्या कारकिर्दित सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या हरएक जवान, खेळाडू आणि तरुणांचे कौतूक होणे जितके गरजेचे आहे, तितकेच महत्वाचे त्यांना हालाखीच्या परिस्थितीतून पूढे आणने हे होय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News