जेव्हा कर्जबाजारी शेतकरी होतो करोडपती; शेतकऱ्याला दुबईत 28.5 कोटींची लॉटरी

वृत्तसंस्था
Monday, 5 August 2019

अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक महिन्याला एक लॉटरी निघते. आपल्या मोठ्या किंमतीच्या लॉटरीमुळे ही भारतीय नागरिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जुलैमधील लॉटरी विलास यांच्या नावावर निघाली आणि त्यांना 1.5 कोटी दिराम मिळाले. जे भारतीय रुपयात 28.45 कोटी होतात.

हैदराबाद : तेलंगणातील एक कर्जबाजारी शेतकरी मालामाल झाला आहे. विलास रिक्काला या शेतकऱ्याला थोडी थोडकी नव्हे तर  28.5 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. कर्ज डोक्यावर असल्यामुळे काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर होता. नोकरीच्या शोधात विलास रिक्काला या शेतकऱ्यानं दुबई गाठली . तिथे जाऊन काम करुन ते आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र एका लॉटरीच्या तिकीटाने  त्याचं आयुष्य बदललं आहे. 

दुबईत प्रत्येक महिन्याला बिग तिकीट ड्रॉ ही लॉटरी  काढली जाते. त्यावेळी विलास यांनी 20 हजार रुपयांचे लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं.  लॉटरी तिकीट खरेदी करताना त्यांनी आपल्या मित्रांकडून अर्धे पैसे घेतले होते. दुबईत काम करुन पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे ते पुन्हा भारतात परतत होते. याच दरम्यान त्यांना 28.5 कोटींची लॉटरी लागल्याची घोषणा करण्यात आली होती.

अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्येक महिन्याला एक लॉटरी निघते. आपल्या मोठ्या किंमतीच्या लॉटरीमुळे ही भारतीय नागरिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. जुलैमधील लॉटरी विलास यांच्या नावावर निघाली आणि त्यांना 1.5 कोटी दिराम मिळाले. जे भारतीय रुपयात 28.45 कोटी होतात.

विलास रिक्काला हे तेलंगणामधील निजामाबाद गावात राहतात. 2014 मध्ये ते दुबईला गेले होते. दुष्काळामुळे विलास दुबईला कामासाठी गेले होते. तिथे त्यांनी हमाली आणि ड्रायव्हरचं काम केलं. गेल्या महिन्यात ते भारतात परतले. लॉटरीचे तिकीट खरेदी करण्यापूर्वी विलास यांना अपेक्षा होती की इतरांना जसे लॉटरी लागते तसे मलाही लागू शकते. जुलै 2019 मध्ये त्यांनी हे तिकीट खरेदी केले होते.

“मित्राकडून मला शनिवारी दुबईवरुन फोन आला. तेव्हा त्यांनी मला लॉटरी लागल्याची खूशखबर दिली. हे एकून मला विश्वास बसत नव्हता. मी जेव्हा माझ्या आईला ही खूशखबर दिली तेव्हा माझ्या आईलाही यावर विश्वास बसत नव्हता”, असं विलास रिक्काला यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News