भारतीय राज्यघटना : प्रश्नोत्तर स्वरूपात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

पुस्तकाचे नाव - भारतीय राज्यघटना : प्रश्नोत्तर स्वरूपात 
प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक - अंजली कुलकर्णी 
किंमत - 350 रुपये 
पृष्ठे - ३००
ISBN - 978-93-87408-11-1
विषय / विभाग - कायदा, स्पर्धा परीक्षा 

पुस्तकाबद्दलची माहिती 
भारतीय राज्यघटनेची निर्मिती, जडणघडण ते राज्यघटनेतील संरचना, महत्त्वपूर्ण बदल या संपूर्ण बाबींचा वस्तुनिष्ठ परिचय भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या संकल्पना, तरतुदी, राज्यघटनेचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग कसा करावा या सर्व विषयांबाबतची प्रश्न उत्तर स्वरूपातील सहज सोप्या भाषेतील मांडणी भारतीय संसद, केंद्र व राज्य कार्यकारी मंडळ, केंद्र व राज्य संबंध, राज्यघटनेच्या महत्त्वपूर्ण समित्या, सर्वोच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्णय, जीएसटी संदर्भातील नवे बदल आदी मुद्दयांचा विशेष परामर्श राज्यघटनेचे अभ्यासक, प्रशासक, वकील, स्पर्धा परीक्षा व सामाजिक शास्त्रांचे शिक्षक, विद्यार्थी, जागरूक नागरिक अशा सर्वांसाठी संग्राह्य संदर्भपुस्तक 

लेखिका अंजली कुलकर्णी यांच्याबद्दल 
अंजली कुलकर्णी या कवयित्री, लेखिका, संवेदनशील कार्यकर्ती आणि राज्यघटनेच्या अभ्यासक म्हणून ओळखल्या जातात. त्या कायदे विषयाच्या पदवीधर आहेत. त्यांचे ललित,  अनुवादित, संपादित आणि वैचारिक असे वैविध्यपूर्ण साहित्य प्रकाशित झाले आहे.लेखनाबरोबरच १९७५ पासून आजतागायत युवक क्रांती दल, माध्यम, स्त्री आधार केंद्र या विविध पुरोगामी सामाजिक चळवळींत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. दूरभाष - 9881736015. ई-मेल - anand.shinde@esakal.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News