'येत्या आठ वर्षात भारत चीनला मागे टाकणार’

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 18 June 2019
  • 'येत्या आठ वर्षात भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार’
  • २०३० पर्यंत दीड अब्ज भारताची लोकसंख्या होईल 
  • भारत हा २०२७ पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असू शकतो

नवी दिल्ली : भारत हा 2027 म्हणजेच अवघ्या सातच वर्षात  लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचे भाकीत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केलय. चीनच्या प्रमाणात भारताची लोकसंख्या जलदगतीने वाढत असल्यामुळे भारत चीनला मागे टाकेल असे  संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. 

2030 पर्यंत दीड अब्ज भारताची लोकसंख्या होईल आणि 2050 पर्यंत1.7 अब्ज होणार आहे. तर, दुसऱ्या हाताला चीनची लोकसंख्या 2030 पर्यंत सध्या ज्या गतीने वाढत आहे त्याच गतीने वाढेल असे सांगितले आहे. 2030 नंतर चीनच्या लोकसंख्या वाढीची गती मंदावेल असे संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विभागाच्या अहवालात सांगण्यात आले आहे.  संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक कामकाज विभागाच्या लोकसंख्येसंदर्भात काम करणाऱ्या विभागाने The World Population 2019 : Highlights या नावे एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये भारत हा 2027 पर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असू शकतो ही बाब नोंदवली आहे. 

सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज इतकी आहे तर चीनची लोकसंख्या 1.38 अब्ज इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला येत्या आठ वर्षात मागे टाकेल असा अहवाल संयुक्त राष्ट्रांनी दिला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News