भारत अमेरिकेला लुटायला निघाला आहे; डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • अमेरिका ही बँक असून तिची लूट करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. 
  • भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भले आयात शुल्क १०० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणले असेल, मात्र तरीही ते आम्ही स्वीकारणार नाही.

वॉशिंग्टन : आयात शुल्कच्या मुद्द्यावर अमेरिकेने भारतावर आरोप केले आहे. अमेरिकन मोटारसायकलवर जादा आयात शुल्क आकारण्याचा भारताच्या भूमिकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली.

अमेरिका ही बँक असून तिची लूट करण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भले आयात शुल्क १०० टक्क्यांवरून ५० टक्क्यांवर आणले असेल, मात्र तरीही ते आम्ही स्वीकारणार नाही. अमेरिका काही मूर्ख देश नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एवढी आगपाखड करण्याचे कारण म्हणजे, भारताने अमेरिकेच्या हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवर आयात शुल्क जादा आकारले आहे. हे ज्यादा शुल्क अमेरिकेला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. एका मुलाखती दरम्यान बोलताना त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.

‘अमेरिकेला आणखी मूर्ख बनवले जाऊ शकत नाही. आमचा चांगला मित्र असलेल्या हिंदुस्थानकडे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपण काय केले हे तुम्हीच पाहा, मोटरसायकलवर १०० टक्के कर. आम्ही मात्र भारताच्या मोटरसायकलवर काहीच शुल्क आकारले नाही.’ 

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत यापूर्वी देखील टीका केली होती. भारत हा जगातील सर्वाधिक कर आकारणारा देश आहे. यामध्ये अमेरिकेच्या वस्तूंवर कर आकारण्यामध्ये भारत पुढे असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News