Ind vs SA कसोटीत अश्विन चमकला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019
  • या सामन्यात भारताने ७१ धावांची आघाडी घेतली
  • रविंद्र जाडेजाने २ तर इशांत शर्माने १ बळी घेत​ले

विशाखापट्टणम - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकात झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ५०२ धावा करून दक्षिण आफ्रिकेसमोर मोठ्ठ आव्हान उभं केलं होत. दक्षिण आफ्रिकेने पहिला डाव हा ४३१ धावांमध्ये आटोपला तर या सामन्यात भारताने ७१ धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजानी केलेल्या गोलंदाजीमुळे पहिला कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकण्याची शक्यता तयार झाली आहे.

भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ७ फलंदाजांची विकेट काढत पहिल्याच कसोटी सामन्यात सर्वोत्तम कामगिरी केली. तसेच या कामगिरीमुळे अश्विनने ६ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणाऱ्या यादीत दुसरे स्थान त्याच बरोबर अनेक विक्रम आपल्या नावावर करून घेतले. रविंद्र जाडेजाने २ तर इशांत शर्माने १ बळी घेत पहिल्या डावात आश्विनला चांगली साथ दिली.

कसोटीत सर्वाधिक ६ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारे गोलंदाज 
अनिल कुंबळे – १९ 
रविचंद्रन आश्विन – १४ 
हरभजन सिंह – १३ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News