पुण्यात ‘एमबीबीएस’च्या प्रवेश क्षमतेत वाढ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

वैद्यकीय शिक्षणातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे - वैद्यकीय शिक्षणातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये मिळून जवळपास ३६७० जागा वाढविण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूण प्रवेश क्षमतेत वाढ झाली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेतली. वैद्यकीय शिक्षण विभागासाठीचे काही प्रस्ताव डॉ. हर्षवर्धन यांच्यासमोर मांडले. राज्यात डॉक्‍टरांची संख्या लक्षात घेता ‘एमबीबीएस’च्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात जागा वाढविण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्याच्या वतीने सादर केला. त्याला केंद्रीय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News