एस.टी पास अभावी विद्यार्थ्यांची गैरसोय; अभाविपचे आगारप्रमुखांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 July 2019
  • तळोधी येथील बसस्थानकावर बस पासची सुविधा नाही.
  • त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना सिंदेवाही, नागभीड बसस्थानक गाठावे लागते.
  • यात विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा जातो

नागभीड: तळोधी येथील बसस्थानकावर बस पासची सुविधा नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना सिंदेवाही, नागभीड बसस्थानक गाठावे लागते. यात विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा जातो. त्यामुळे तळोधी बसस्थानकावर बस पास देण्याची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. तसे निवेदन त्यांनी आगारप्रमुखांना दिले आहे. 

तळोधी येथे दोन वरिष्ठ महाविद्यालय, दोन कनिष्ठ महविद्यालय आहे. कृषी महाविद्यालय, बीएड कॉलेज, बीपीएड कॉलेज, माध्यमिक शाळा आहेत. शिक्षणाच्या सर्व सोयी उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ये- जा करतात. तळोधी बस डेपोत पास मिळण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सिंदेवाही किंवा नागभीडला जावे लागते. यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

वेळेअभावी विद्यार्थ्यांना काही दिवस पाससाठी ताटकळत राहावे लागते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून तळोधी येथे बस पास मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. तसे निवेदन त्यांनी आमदार भांगडिया, आगारप्रमुखाला दिले आहे. शिष्टमंडळात नगरमंत्री प्रवीण गिरडकर, आकाश बांगरे, रोशन दलाल, वैभव मानगुलदे यांचा समावेश होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News