शैक्षणिक ॲपचे आज उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 6 August 2019

चाळीसगाव : भारतीय बहुजन क्रांती दलाचे संस्थापक डॉ. मोरसिंग राठोड यांनी सर्व समाजांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकरीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती व्हावी, या दृष्टीने मोबाईल ॲप तयार केले आहे. याचा उद्‌घाटन सोहळा उद्या (ता. ६) सकाळी दहाला शहरातील घाट रोडवरील विठ्ठल सभागृहात होणार आहे, अशी माहिती श्री. राठोड यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मूळचे लोंजे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी असलेले डॉ. मोरसिंग राठोड यांनी सांगितले, की चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत वंचित आघाडीतर्फे ते इच्छुक आहेत. त्यादृष्टीने विविध सामाजिक उपक्रम ते सध्या राबवीत आहेत.

बंजारा तसेच इतर सर्व समाजातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेषतः इंग्रजी विषय सोपा जावा, यासाठी ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये इंग्रजी बोलण्यासाठीच्या महत्त्वाच्या टिप्सही दिलेल्या आहेत. ॲपमध्ये ४२ प्रकारच्या जीवन कौशल्यांचाही समावेश आहे. याप्रसंगी प्रवक्ते भीमराव चव्हाण व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News