MIMच्या खा.इम्तियाज जलील यांच्यावर महाराष्ट्राची मोठी जबाबदारी, दिले राज्याचे 'हे' पद

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

मुंबई: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जलील यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकली आहे. 

मुंबई: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांची ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमआयएम) या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जलील यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने टाकली आहे. 
इम्तियाज जलील हे एमआयएम या पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एमआयएम पक्षाने ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह आघाडी तयार करून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली निवडणुका लढवल्या. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली. आता विधानसभेलाही एमआयएम व वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे सामोरे जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 60 ते 70 मतदारसंघांवर वंचित आघाडी निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे जलील यांच्यावरील नवी जबाबदारी महत्त्वाची ठरली आहे.

दरम्यान, इम्तियाज जलील यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका नुकतीच औरंगाबादच्या खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. 

इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील प्रादेशिक अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्र - अकील मुजावर, विदर्भ - नजीम शेख, तर मराठवाडा प्रदेशअध्यक्षपदी फिरोज लाला यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय शंकर पटनी हे एमआयएमचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत राहील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News