इम्रान खान आज घेणार ट्रम्प यांची भेट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • ‘व्हाइट हाऊस’मध्ये दोन्ही नेत्यामध्ये होणार चर्चा
  • शनिवारी वॉशिंग्टनमध्ये झाले थंड स्वागत 
  • परंतु स्वागतासाठी एकही बडा नेता विमानतळावर उपस्थित नव्हता

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेत दाखल झाले असून, ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सोमवारी ‘व्हाइट हाऊस’मध्ये भेट घेणार आहेत. या भेटीत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर परिणाम करणाऱ्या बाबींवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे. 

ट्रम्प यांनी सातत्याने पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली आहे, तसेच दहशतवादाच्या विरोधात ठोस पावले उचलण्यासाठी ते पाकिस्तानवर दबाव टाकत आहेत. त्याच बरोबर पाकिस्तानला करण्यात येणारी लष्करी मदत रोखण्याचाही आदेश त्यांनी दिला होता.

त्यामुळे उभय देशांतील संबंध ताणले गेले होते. या पार्श्वभूमीवर खान यांच्या अमेरिका दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा खान यांचा हा पहिल्याच अमेरिका दौरा आहे. 

दरम्यान खान यांचे शनिवारी वॉशिंग्टनमध्ये थंड स्वागत झाले. त्यांच्या स्वागतासाठी एकही बडा नेता विमानतळावर उपस्थित नव्हता.
 

"इम्रान खान यांनी सामान्य प्रवाशांप्रमाणे अमेरिकेत जाऊन देशाच्या पैशांची बचतच केली आहे. इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी स्वत:चा अहंकार मिरवलेला नाही. यामध्ये वाईट काय ते मला सांगा ?"

- उमर अब्दुल्ला, 
नेते, नॅशनल कॉन्फरन्स

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News