ब्रेकअप पेक्षा रिलेशनशिपमध्ये 'या' ४ गोष्टीला महत्व!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप पैक्षा काही महत्वाच्या गोष्टी असतात जे तुमत आयुष्यात नातं तोडण्यापेक्षाही वाईट असत.

'जीना मरणा तेसे संग' अशी शपथ घेणारे अनेक कपल्स काही कालावधीनंतर एकमेकांच तोंड पाहण पसंद करत नाहीत. रिलेशनशिपमध्ये असतांना अशा काही गोष्टी कळत नकळत घडतात ज्यामुळे नातं दुरावत जात. शेवटी ब्रेकअप होते. रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप पैक्षा काही महत्वाच्या गोष्टी असतात जे तुमत आयुष्यात नातं तोडण्यापेक्षाही वाईट असत.

खोटं बोलणे
रिलेशनशिपमध्ये पार्टनरसोबत कधीचं खोटं बोलू नयेत. कारण एक खोटं लपवण्यासाठी अनेकदा खोटं बोलाव लागतं तरी अनेकजन पार्टनरसोबत खोट बोलतात आणि नात्यात आनंद गमवुन बसतात.
 

फायद्यासाठी नातं नको
फायदा बघुन रिलेशनशिप मध्ये राहण ब्रेकअप पैक्षा चुकीच आहे. कारण आपल नातं हे फायद्यासाठी निर्मान झाल यांची जाणिव दोघापैकी एकाला जरी झाली तरी दोघांनाही त्रास होईल.  

एकमेकांशी बोलणं बंद करणे
छोट्या मोठ्या कारणामुळे रिलेशनशिपमध्ये भांडण होतात. आशावेळी एकमेकांशी बोलणं बंद करणे चुकीच आहे. कारण एकमेकांशी बोलूण समस्या सोडवता येतात. एकमेकांशी बोलणं बंद केल्यामुळे गैरसमज वाढतात. याचा त्रास दोघांना होतो.

समानतेची भावना
रिलेशनशिपमध्ये समानतेची भावनाच दोन्ही पार्टनरला एकमेकांमध्ये बांधून ठेवतात. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये केवळ तुमच्या आनंदासाठी असाल, तुम्ही केवळ तुमच्या इच्छांचा विचार करत असाल तर याने तुमच्या पार्टनरला दु:खं होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News