प्रशासकीय क्षेत्रात नोकरीसाठी वाचन अत्यावशक ...

अमित आवारी
Monday, 1 April 2019

अकरावीत असताना मोठे भाऊ मनोज काळे भारतीय सैन्यातील अधिकारीपदाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यापासून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षा देऊन सैन्यात अधिकारी होण्याचे ठरविले. भाऊ पुढे मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी झाले. त्यांनी मला स्पर्धा परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले.

प्रशासकीय क्षेत्रात येण्याचा निर्णय शिक्षणाच्या कोणत्या टप्प्यावर घेतला?

अकरावीत असताना मोठे भाऊ मनोज काळे भारतीय सैन्यातील अधिकारीपदाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. त्यापासून प्रेरणा घेत स्पर्धा परीक्षा देऊन सैन्यात अधिकारी होण्याचे ठरविले. भाऊ पुढे मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी झाले. त्यांनी मला स्पर्धा परीक्षा देण्यास प्रोत्साहन दिले.

परीक्षेसाठी अभ्यास कसा केला?

सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयात अध्यापन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गात सुरवातीला अभ्यास केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास केला. तेथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या चांगल्या मित्रांचा ग्रुप मिळाला. ग्रुपमध्ये चर्चेतून अभ्यास व्हायचा. त्यातून खूप शिकायला मिळायचे. जुन्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्‍नपत्रिका सोडवायचो.

प्रशिक्षणाचा अनुभव कसा होता?

परीक्षेचा निकाल २०१५मध्ये लागला. फेब्रुवारी २०१६ला कामाला सुरवात केली. डिसेंबर २०१६ला पुण्यातील ‘यशदा’ येथे दीड महिन्याचे प्रशिक्षण घेतले. काम व त्यानंतर प्रशिक्षण असल्याने प्रशिक्षणाचा फायदा झाला. प्रत्यक्ष कामात आलेल्या अडचणी प्रशिक्षणात सुटल्या. 

 प्रत्यक्ष अधिकारी म्हणून काम करतानाचा अनुभव कसा आहे?

 प्रत्यक्ष काम करताना पुस्तकी ज्ञानापेक्षा तर्कशक्‍तीचा जास्त फायदा होतो. प्रत्येक व्यक्‍तीकडून           काहीतरी शिकण्यासारखे असते.

स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना आपला सल्ला?

अभ्यासात वेळेचे नियोजन, भरपूर सराव व प्रश्‍नपत्रिका सोडवताना संयम हवा. कालावधी मर्यादित असल्याने अभ्यासक्रमाशी संलग्न पुस्तकांचे व वर्तमानपत्रांचे वाचन करावे. अभ्यासक्रमाशी पूरक असलेलेच अवांतर वाचन करावे. ग्रुप स्टडीने संकल्पना स्पष्ट होतात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना दुसरा पर्यायही तयार ठेवावा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News