मॉडेल कॉलेजच्या नवीन इमारतीत स्थलांतराचा परिणाम, बस सुविधेची मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

विद्यार्थ्यांसाठी कॉलेजतर्फे बसस्थानकापासून मोफत बसची सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. 

घनसावंगी : मॉडेल कॉलेजचे नुकतेच नवीन इमारतीत स्थलांतर झाले आहे. कॉलेजची नवीन इमारत ही घनसावंगीच्या मुख्य बस स्थानकापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करून कॉलेजला जावे लागत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी कॉलेजतर्फे बसस्थानकापासून मोफत बसची सुविधा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. 

मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पायी जाण्यामुळे पोचायला उशीर होत आहे. त्यामुळे अनेकांची सुरवातीची तासिका बुडत असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कॉलेज ते बसस्थानक अशी मोफत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ‘अभाविप’ ने निवेदनाद्वारे प्राचार्यांना करण्यात आली आहे.

यावेळी ‘अभाविप’ चे जिल्हा संयोजक विक्रम राऊत, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख किशोर मोरे, गणेश घुगे, सिद्धेश्वर सपाटे, अनिकेत कोल्हे, दीपक उगले, मदन माठे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहा घायतडक, विद्या आठवे, कृष्णा घायाळ; तसेच भरपूर विद्यार्थी संख्या होती. 

‘अभाविप’चे विक्रम राऊत म्हणाले, की विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता विद्यापीठाने मंजुरी न दिल्यास मॉडेल कॉलेजने स्वनिधीतून बस सुविधा उपलब्ध करून द्यावी. दरम्यान, प्राचार्य विश्‍वास कदम म्हणाले, की विद्यार्थ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ पातळीवर पाठपुरावा केला जाईल. विद्यार्थ्यांना बस सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News