मी पाठिशी आहे! अधिकारी, प्राध्यापकांनी दबावात येऊ नये: कुलगुरु डॉ. येवले 

अतुल पाटील 
Friday, 2 August 2019
  • प्राध्यापक डॉ. प्रकाश खिराडे, परीक्षा विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुभाष मुंगीकर, पात्रता विभागातील मिर्झा बरकत बेग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला.
     

औरंगाबाद: विद्यापीठ ही सार्वजनिक संस्था असून तिच्यावर सर्वांचा अधिकार आहे. मात्र, अशैक्षणिक आणि अन्य घटकांकडून होणारा हस्तक्षेप, दबाब खपवून घेतला जाणार नाही. कर्मचारी, अधिकारी व प्राध्यापकांनी कसल्याही दबावाला बळी न पडता खंबीरपणे काम करावे, चांगले व प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहू, असा शब्द कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिला. विद्यापीठातील गर्दी निम्याने कमी झाल्याचा संदर्भ निघाल्यानंतर ते बोलत होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेवा गौरव समारंभप्रसंगी डॉ. येवले बोलत होते. पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रकाश खिराडे, परीक्षा विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुभाष मुंगीकर, पात्रता विभागातील मिर्झा बरकत बेग यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव करण्यात आला. 

यावेळी डॉ. येवले म्हणाले, विद्यापीठात सेवा गौरव समारंभ अत्यंत भव्य व दिमाखदार होतो याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती न झाल्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्याही विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरु करावी लागेल. गेल्या दिवसांत अनेक गोष्टींची जाणीव मला झाली.

भेटायला येणारे विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यकर्ते अडचणी घेऊन येतात. या मंडळीनी पर्यायदेखील सांगावेत. वंचित, कष्टकरी व बहुजन समाजाची पहिली पिढी आपल्या विद्यापीठात शिक्षण घेत आहे. अशा या विद्यापीठाच्या पारदर्शक व गतीमान विद्यार्थी केंद्रित प्रशासन राबवून विद्यापीठाचा गाडा योग्य वळणावर आणु, असा विश्वास डॉ. येवले यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. दिलीप भरड यांनी आभार मानले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News