दुर्गमित्रांकडून दुर्लक्षित वास्तूंना झळाळी... महाराजांचा जयघोष

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • जंजिरे-माहीम किल्ल्यावर श्रमदान; संवर्धन मोहिमेत स्वच्छतेवर भर

पालघर - माहीम गावाचा इतिहास सांगणाऱ्या जंजिरे-माहीम किल्ल्यावर रविवारी दुर्गमित्रांनी श्रमदान करून संवर्धन मोहीम राबवली. या वेळी त्यांनी किल्ल्याचा परिसर स्वच्छ करून झाडे, दगड, मातीखाली बंदिस्त झालेल्या दुर्लक्षित वास्तूंना नवी झळाली दिली. मोहिमेत किल्ले वसई मोहीम परिवार, माहीम किल्ले संवर्धक परिवार, एनसीसीएक्‍स कॅडेट असोसिएशन, युवा शक्ती प्रतिष्ठान या चार संस्थांच्या प्रतिनिधींनी भाग घेला. 

सकाळी ७ ते दुपारी १२ दरम्यान झालेल्या संवर्धन मोहिमेस एकूण २१ दुर्गमित्रांचे सहकार्य लाभले. माहीम किल्ल्यातील साठवणीची कोठारे, बहुतेक पुरातन वास्तू शेकडो वर्षांत मातीचा ढिगारा आणि दगड यात बंदिस्त झालेल्या होत्या. दुर्गमित्रांनी तब्बल पाच तास श्रमदान करून त्यांची स्वच्छता केली. 

माहीम किल्ल्यावर २००७ पासून सुरू असणारे संवर्धनकार्य आणि किल्ल्यातील वास्तूंच्या श्रमदानाचा आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. स्थानिक दुर्गमित्रांचे बहुमोल सहकार्य मिळत असून ही महत्त्वाची बाब आहे. - आकाश जाधव, संवर्धन प्रतिनिधी, किल्ले वसई मोहीम   

माहीम किल्ल्याच्या संवर्धनासाठी दुर्गमित्रांना स्थानिक पातळीवर सक्रिय सहकार्य मिळेलच. तसेच आगामी मोहिमेत किल्ल्यातील कायमस्वरूपी दारूबंदीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.  - उन्मित ठाकूर, दुर्गमित्र प्रतिनिधी, माहीम किल्ले संवर्धक परिवार  

‘माहीम किल्ल्याचा प्राचीन इतिहास आणि सध्या उपलब्ध असणारे मोजके अवशेष यांचे संकलन केले आहे. दुर्गसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन दुर्गमित्र संवर्धन करीत आहेत. - प्रीतम पाटील, दुर्गसंवर्धन प्रतिनिधी, युवाशक्ती प्रतिष्ठान

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News