तुम्हाला मरायचं असेल तर येथे या, येथे फुकटात मरण मिळेल...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

डोंगरीतील केसरभाई इमारतीलगतच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळून १३ जणांचा बळी गेला. हे सर्व भाडेकरू होते. मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवासी जणू मृत्यू भाड्याने घेऊन राहत आहेत.

डोंगरीतील केसरभाई इमारतीलगतच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळून १३ जणांचा बळी गेला. हे सर्व भाडेकरू होते. मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवासी जणू मृत्यू भाड्याने घेऊन राहत आहेत.

मुंबई - डोंगरीतील केसरभाई इमारतीलगतच्या अंतर्गत भागात उभारण्यात आलेली धोकादायक इमारत कोसळून १३ जणांचा बळी गेला. हे सर्व भाडेकरू होते. मुंबईत अशा अनेक धोकादायक इमारतींमध्ये हजारो रहिवासी जणू मृत्यू भाड्याने घेऊन राहत आहेत. म्हाडाने २३ उपकरप्राप्त इमारती धोकादायक ठरवून त्या रिकामी केल्याचा दावा केला आहे; मात्र पाच इमारतींमध्ये अद्याप रहिवासी जीव धोक्‍यात घालून राहत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत उघडकीस आले.

उमरखाडी परिसरातील सिराज मेन्शन या इमारतीत घर मालकांनी स्वत: घरे रिकामी करून तिथे भाडेकरू ठेवले आहेत. बदामवाडी येथील चाळीतील रहिवाशांचा विकासकासोबतचा वाद १० वर्षांत संपलेला नाही. त्यामुळे रहिवासी घरे साडून जाण्यास तयार नाहीत. मुंबईतील १९४० पूर्वीच्या इमारती उपकरप्राप्त (सेस) म्हणून गणल्या जात असून त्यांच्या देखभालीची जबाबदारी म्हाडाकडे आहे. धोकादायक इमारती रिकामी झाल्यानंतर त्या पाडल्या नाहीत, तर नजीकच्या इमारतींनाही धोका निर्माण होऊ शकतो.

इमारतींच्या मोडकळीस आलेल्या भागांची मंडळातर्फे तातडीने दुरुस्ती केली जाते. धोकादायक भाग पाडला जातो. रहिवाशांना संक्रमण शिबिरांत स्थलांतरीत केले जाते. मूळ जागेपासून संक्रमण शिबिरे लांब असल्याने अडचण होते. लवकरच म्हाडाला आणखी काही संक्रमण शिबिरे उपलब्ध होतील. - दिनकर जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी मुंबई पुर्नरचना व दुरुस्ती मंडळ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News