शेती करावी तर अशी...

राजेश पाटील, किनवट
Monday, 8 July 2019

आपला देश हा कृषी प्रधान देश आहे देशातील काही जमीन सुपीक ओलीताची काही खडकाळ काही रेताळ आहे जिथे ज्या प्रकारची मृदा आहे त्या प्रमाणे त्या जमिनीवर पिक येते

आपला देश हा कृषी प्रधान आहे. देशातील काही जमीन सुपीक ओलीताची, काही खडकाळ, तर काही रेताळ आहे. जिथे ज्या प्रकारची मृदा आहे त्या प्रमाणे त्या जमिनीवर पिके येतात.

आता पावसाळ्याचे दिवस आहेत. मला वाटते काही जे समजदार शेतकरी आहे त्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षण शाळेत किंवा विज्ञान केंद्रात तपासणी केली असेल, कारण तेथील तज्ञ योग्य सल्ला देतात व कोणते पीक घ्यावे ही माहिती देतात. 

दुसरी गोष्ट म्हणजे शेतामध्ये शक्यतो रासायनिक खते न वापरता शेद्रींय खत शेणा पासून बनलेले किंवा गाडुंळ खत वापरावे. जेणेकरून पिक भरघोस व विना केमीकल अरासायनिक असेल. त्यामुळे आरोग्य चांगले राहील तसेच कीटकनाशक फवारणी ऐवजी कडू लिंबाचा पाला व लिंबोळी याचे मिश्रण करून तयार केलेले फवारणी पाचपट योग्य ठरेल व शेंद्रीय खतामुळे जमिनीची सूपिकता टिकून राहील व जमिन बंजर होणार नाही. तिथे दूसर पीक सूध्दा उगवेल व पावसाळ्यात पाणी मूबलक असल्याने  शेतकरी सहसा कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी, बरबटी, मिरची, टमाटे, पानगोबी, फूलगोबी ईत्यादी पिके घेतात पण या बरोबरच नगदी पीक सूध्दा शेतकऱ्यांनी घ्यायला हवी. 

उदा. हळद, अद्रक, फुल शेती, आलू/बटाटा, पपई, बीट, कांदे, तंबाखू, ऊस, सूर्यफूल तसेच औषधी वनस्पतीची बाजारात  खूप मागणी आहे. कोरफड, पानफूटी, ईडलिंबू, ओवा, कडू दोडके, धोतरा, जायफळ, चमकूरा, कायफळ, एरंड, निलगिरी, डोरल, डांगर, तोडंले, कटूरले, देवबाभूळ, निरगूडी, हनुमान गड्डा, शेतावरी, तूळस, सूरकंद, फणस, गूगूळ, अडूळसा, अश्वगंधा, शतावरी आदींचा समावेश यात होतो अशा एक ना अनेक औषधी वनस्पतीस देश परदेशातील बाजारपेठेत मागणी आहे 

म्हणून पावसाळ्यात पीक घेताना जवळच्या शासकीय कृषी कार्यालयातील तज्ञाचा आवश्यक सल्ला घ्यावा. पावसाळ्यात नद्या, तलाव, विहीरी जवळ असल्यास योग्यच, नसल्यास शासकीय योजनेतून शेत तळे उभारावे आणि पीक विमा सूध्दा करावा व लाभ घ्यावा. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News