"दम असेल,तर समोर या" राजू शेट्टींना या नेत्याचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • सदाभाऊ खोत यांचे राजू शेट्टी यांना आव्हान
  • स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी  केलेल्या घोषणाबाजीवर  केली टीका

पुणे : ‘घोषणा काय देता, तुमच्यात हिंमत असेल, तर मैदानात या. मला बोलवा, मैदान ठरवा, तारीख सांगा, सदाभाऊ तेथे एकटा यायला तयार आहे,’ असे आव्हान कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले.

पंतप्रधान पीकविमा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी खोत यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली. खोत यांच्या भाषणादरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत पंतप्रधान पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.

खोत म्हणाले,

‘‘घोषणा देणाऱ्यांचे शेतकऱ्यांशी काही देणे घेणे नाही. तुमची जागा आम्ही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात दाखवून दिलेली आहे. ही मस्ती सदाभाऊ आणि कार्यकर्ते चालू देणार नाहीत. तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहात, हे लोकशाहीत जनतेने दाखवून दिले आहे.’’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News