जर तुमची बॅंकेची काम असतील तर लवकर करुन घ्या, बॅंका 4 दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 September 2019

जर तुमची काही बॅंकेची काही काम असतील तर तुम्ही ती लवकरात लवकर करुन घ्या कारण बॅंका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत.

जर तुमची काही बॅंकेची काही काम असतील तर तुम्ही ती लवकरात लवकर करुन घ्या कारण बॅंका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत.

केंद्र सरकार 10 बँकांचं विलीनीकरण करणार आहे. त्याविरोधात बँक अधिकाऱ्यांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. 26 आणि 27 सप्टेंबरला हा संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतर लगेच चौथा शनिवार ( 28 सप्टेंबर ) आणि रविवार ( 29 सप्टेंबर ) आले आहेत. त्यामुळे चार दिवस बँका बंद असतील. या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गेनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या निर्णयाच्या निषेधार्थ संप पुकारण्यात येणार आहे. या संपाला सर्व संघटनांचा पाठिंबा आहे.

पंजाब नॅशनल बँक ही देशातील तिसरी मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत लवकरच तीन छोट्या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. या बँका आहेत ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स, आंध्र बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News