पेट्रोल पंपावर 'या' १२ सुविधा मोफत मिळाल्या नाहीत, तर असा शिकवा धडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019

कोणत्याही पेट्रोल पंपावर सामान्य लोकांच्या  गाडीमध्ये  हवा भरण्याची  सुविधा अगदी  मोफत पुरवली जाते. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या मालकाला  हवा भरण्याची  इलेक्ट्रॉनिक  मशीन  पट्रोल पंपावर लावावी लागते. सोबतच टायरमध्ये हवा भरण्यासाठी त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला तेथे थांबावे लागते.

कोणत्याही पेट्रोल पंपावर सामान्य लोकांच्या  गाडीमध्ये  हवा भरण्याची  सुविधा अगदी  मोफत पुरवली जाते. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या मालकाला  हवा भरण्याची  इलेक्ट्रॉनिक  मशीन  पट्रोल पंपावर लावावी लागते. सोबतच टायरमध्ये हवा भरण्यासाठी त्यांच्यातल्याच एका व्यक्तीला तेथे थांबावे लागते.

पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरले  जाते. तर तुम्हाला बिल घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पेट्रोल पंपावर काही सुविधा अगदी मोफत  मिळतात. मार्केटिंग डिसिप्लिन गाइडलाइंस याप्रकारच्या पेट्रोल पंपच्या मालकाला सामान्य लोकांना 'या' सुविधा देण भाग आहे. जर त्याने असे नाही केले, तर त्याबद्दल तक्रार करू शकतो. या तक्रारी  नंतर पेट्रोल पंपाच लायसन्स  रद्द होऊ शकतं आणि दंडही भरावा लागतो. 

पाहा कुठल्या सुविधा मोफत मिळतात...
१. सामान्य जनतेला सगळ्या पेट्रोल पंपावर टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा मोफत मिळते.
२. पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा ही मोफत  असते.
३. पेट्रोल पंपावर वॉशरूमची सुविधा देखील मोफत केलेली जाते, जर वॉशरूम तुटलेले फुटलेले किंवा अस्वच्छ असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. 
४. पेट्रोल पंपावरती सामान्य जनतेसाठी फोन कॉलची सुविधा देखील उपलबद्ध केली पाहिजे, कारण कधी इमरजंसी कॉल करायचा असेल आणि नेटवर्क प्रॉब्लम किंवा काही कारणास्तव फोन लागत नसेल तर या मोफत फोन सुविधेचा वापर सामान्य जनता करू शकते. 
५. पेट्रोल पंपावरती प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असणे गरजेचे आहे, कधीही एखादा अपघात होऊ शकतो, त्यात हे साहित्य उपयोगी येते. 
६. पेट्रोल पंपावरती  फायर सेफ्टी डिवाइसेज असणे खूप महत्वाचे आहे. पेट्रोल पंपावरती आग लागण्याची श्यक्यता खूप जास्त  असते, त्यासाठी  फायर सेफ्टी डिवाइसेज सगळ्या पेट्रोल पंपावर असणे गरजेचे आहे. 
७. ज्या पेट्रोल पंपावर तुम्ही पेट्रोल भरता तिथून बिल घेणे हा तुमचा अधिकार आहे. जर तेथील सहकारी तुम्हाला बिल देण्यास नकार देत असतील तर  त्याची तक्रार नोंदवणे गरजेचे आहे.
८. सर्व ग्राहकांना  क्वालिटी और क्वांटिटी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. 
9. पेट्रोल पंपामध्ये  पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती डिस्पलेवर दर्शवणे गरजेचे आहे, यामुळे वाद-विवाद होणार नाहीत. 
१०. सर्व पेट्रोलपंपावर तक्रार पेटी असायला हवी. 
११. पेट्रोल पंपावर मालक आणि पेरोलीयम कंपनीचे नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देणे गरजेचे आहे. 
१२. सगळ्या  पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप सुरू होण्याचा आणि बंद होण्याची वेळ दर्शवणे गरजेचे आहे.

जर पेट्रोल पंपावर यापैकी कुठलीही सुविधा मोफत दिली नाही किंवा यासाठी तुमच्या कडून पैसे वसूल केले जात असतील तर तुम्ही पेट्रोल पंपाच्या  मालकाविरुद्ध तक्रार करू शकता. ही तक्रार सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम  या पोर्टलवर जाऊन करू शकता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News