हे नाही केलं तर तुम्ही सिंगलच मरणार...

अक्षय सुनीता मोहन
Thursday, 31 January 2019

आता तुम्ही म्हणाल कपड्यावरून सिंगलता कशी ओळखली जात असेल? तर तेच सांगतोय भावा! सिंगल आहेस , कुणाचेच मेसेज येत नाहीयेत तर थोडा पाच मिनिटं थांब की.

लहान असताना साधारणतः शाळेच्या चड्डीला आपल्या ठिगळ लागलेले असायचे. याला जास्त करून आर्थिक परिस्थिती आणि दुसरे म्हणजे खाली बसून घासत खेळण्याच्या सवयीने फाटलेली असायची.

तेव्हा ठिगळ लावून शाळेत जायला पण लाज नव्हती वाटायची. आता तर लहान वयातच मुलं अंडरवीयर घालतात. तेव्हा जर आपण अंडरवीयर घातली असती तर कदाचित आपणही ठिगळ लावलेली चड्डी न घालता थेट फाटकी चड्डी घातली असती. ठिगळाचे काम अंडरवीयरने केलेच असते.

वडीलधारी माणसे आजकालच्या आपल्या गुडघ्यावर फाटलेल्या पॅन्टची थट्टा करतात. मात्र आपण तसे पॅन्ट अधिक पैसे देऊन खरेदी करतो.

भावा स्टेट्स मॅटर करतं रे!

तर अंडरवीयर, ठिगळ, पॅन्ट हे काय सांगत बसलोय मी तुम्हाला? मला तर घातलेल्या कपड्या वरून मुलगा सिंगल आहे की नाही ? हे ओळखण्याची कला होती! ती सांगायची आहे.

आता तुम्ही म्हणाल कपड्यावरून सिंगलता कशी ओळखली जात असेल? तर तेच सांगतोय भावा! सिंगल आहेस , कुणाचेच मेसेज येत नाहीयेत तर थोडा पाच मिनिटं थांब की.

तर गोष्ट आहे अमेरिकेतली. आपण जसे ठिगळ लावलेली चड्डी घालून शाळेत जायचो. तसे अमेरिकेत शर्टच्या मागच्या बाजूला लूप असलेले शर्ट घालून कॉलेजला जायला लागायचे. तो जमाना होता आपल्याकडे जेव्हा अमिताभचे बेलबॉटम कॉलेजमधल्या तरुणाईत हैदोस घालत होते तेव्हाचा.

अमेरिकेत कॉलेजमधल्या मुलाला सिंगल की मिंगल कसे ओळखायचे म्हणून त्यांनी शर्टच्या मागच्या बाजूला एकदम मानेखाली शर्टला लूप शिवायला सुरू केली. ही लूप जर मधून फाडलेली असेल तर समजून घेतले जायचे पठ्ठा मिंगल आहे.

होय, आताच्या मुली जश्या पैशाने पॅन्टची खिसे फाडतात तश्या तिकडे मुली मुलांच्या शर्टची रिलेशनशिपमध्ये आल्यावर लूप फाडत असत.म्हणजे गडी एंगेज आहे हे जगाला कळून जात असे.
ज्यांच्या शर्टच्या लूप फाटलेल्या नसत ते आपल्याच कॅटेगिरीमधले म्हणजे सिंगल आत्मा म्हणून मानले जात असत.

भावा असे सिंगल आत्मे अमेरिकेत पण होतेच की. आपल्याच देशात सिंगलता गंभीर नाहीये. मात्र जेव्हा ही शर्टला लुप शिवण्याची फॅशन भारतात आली! तेव्हा या एवढ्या चांगल्या लूप फॅशनला आपल्या मुलांनी ## लावले.

कारण रुमकरून हँगरची मारामार असलेल्या आपल्या सारख्या मुलांनी भिंतीच्या खिळ्याला लूप अटकवत शर्ट टांगून ठेवायला सुरवात केली. साला इथे मुलगी पटणार की नाही? याची हमी नसलेले आम्ही त्या लुपचे काय कौतुक करत बसू?

मात्र लॉजिक आणि भारत याचा भयंकर संबंध आहे. कुतूहल मारणाऱ्या भारतात लॉजिक अजूनही भन्नाट पुढे येतच असतं. आपण सिंगल असलो म्हणून काय झालं? शर्टची लुप फाटली नाही हेच बरंय म्हणजे रूममध्ये आम्हाला शर्ट लटकवण्यास मारामार करायला लागत नसे.

तर व्हॅलेंटाईन डे जवळ येतोय.तुमच्या शर्टला जर लूप असेल तर तो लूप फाडून टाकणार अशी कुणीतरी लवकर आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा.

किती दिवस तो लूप खिळ्याला लटकवायचा भावड्या?

कपडे शिवूनच घे! जास्त दिवस टिकतात असे ऐकत तारुण्यात आलेलो लोक आहोत आपण! आता एक पाऊल पुढे टाकून लूप फाडुनच घे!! किती दिवस सिंगल आत्मा बनून भटकणार? असे स्वतःला विचार आपल्याच पाठीवर आपलाच हात ठेवून एकदा फक्त मुलींना 'हो' म्हणा असे विचारत फिर.

बाकी अभ्यास होत राहील रे. शर्टचे लूप फाटले पाहिजे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News