मन चंगा तो कटोरीमे गंगा

श्रीनिवास गेडाम
Friday, 12 July 2019

रोजच्या व्यवहारात नाना ढंगाची, नाना रंगाची माणसं भेटतात. कुणी चांगलं वागतं. कुणी दुर्व्यवहार करतं. कुणी कसं वागावं बोलावं आपल्या हातात नसतं. प्रत्येकाचा आपला एक स्वभाव असतो. त्यानुसार ते वागत असतात. कुणी शांत समजूतदार नम्र स्वभावाचं असतं. कुणी वाजवीपेक्षा भांडकुदळ रागिष्ट स्वभावाचं असतं. भांडकुदळ, रागिष्ट स्वभावाची माणसं छोट्या छोट्या कारणावरून हमरीतुमरीवर येतात. कुणाला काय बोलतील याचा नेम नसतो.

रोजच्या व्यवहारात नाना ढंगाची, नाना रंगाची माणसं भेटतात. कुणी चांगलं वागतं. कुणी दुर्व्यवहार करतं. कुणी कसं वागावं बोलावं आपल्या हातात नसतं. प्रत्येकाचा आपला एक स्वभाव असतो. त्यानुसार ते वागत असतात. कुणी शांत समजूतदार नम्र स्वभावाचं असतं. कुणी वाजवीपेक्षा भांडकुदळ रागिष्ट स्वभावाचं असतं. भांडकुदळ, रागिष्ट स्वभावाची माणसं छोट्या छोट्या कारणावरून हमरीतुमरीवर येतात. कुणाला काय बोलतील याचा नेम नसतो.

एखाद्या प्रसंगी अंगावर हातही उचलू शकतात. समोरची व्यक्ती दुर्बळ, शांत स्वभावाची असेल तर प्रत्यूत्तर देऊ शकत नाही. प्रत्यूत्तर न दिल्यामुळे मनाची घुसमट होते. झालेली घटना सतत आठवून खूप बेचैन होतो. बोलणारा एकदाच वाईट बोलून गेलेला असेल, पण आठवणारा वारंवार मनात आठवून मनाला बजावत असतो बघ तो तुला असा म्हणाला. यात नुकसान कुणाचं होत आहे? आठवून नाहक परेशान होणाऱ्या गृहस्थाचं! घटना होऊन गेलेली आहे. मनाला त्रास करून घेतल्याने प्रश्न मिटणार नाही. एकदा एका माणसाने भगवान बुध्दाला खूप शिव्या दिल्या तरी ते शांतच राहिले.

समोरची व्यक्तीला वाटलं होतं ते चिडतील. अस्वस्थ होतील. जेव्हा असं काहीच घडलं नाही तेव्हा त्या व्यक्तीनं विचारलं, " मी तुम्हाला इतक्या वाईट शिव्या दिल्या तरी तुम्ही शांत कसे?" भगवान बुध्दानं यावर मोठं मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, " मी चिडलो असतो, अस्वस्थ झालो असतो तर तुझ्यात नि माझ्यात काय अंतर उरलं असतं! तू लाख शिव्या दिल्यात पण मी स्विकारल्या कुठे? प्रश्न स्विकारल्या नंतर येतो." बोलणा-याचा उद्देशच मुळात आपल्याला हर्ट करण्याचा , उत्तेजित करण्याचा असतो. उत्तेजित होऊन समोरच्याचा उद्देश सफल होऊ देणं मुर्खपणाचं आहे. एखादी व्यक्तीआपल्या विरोधात आपल्या मागे काहीही बोलली तर आपल्याला फरक पडत नाही.

पण एखाद्यानं तिखटमीठ लावून 'अमूक व्यक्ती तुला असं म्हणत होती' असं सांगितलं की आपण क्षणात अस्वस्थ होतो. खरोखरच ती व्यक्ती असं बोलली असेल काय याचा थोडा सुध्दा विचार करत नाही. आता हीच गोष्ट लाईटली घेतली आणि विचार केला की, "असं म्हणाला का तो....? ठीक आहे म्हणू दे! मी त्याला कवडीची किंमत देत नाही!" राहिला अस्वस्थ होण्याचा प्रसंग! रस्त्यावर कुणी कुणाला शिव्या देत असेल तर आपण शहाणे बनून ' जाऊ दे ' म्हणतो. पण आपल्यावर जेव्हा ही गोष्ट बितते तेव्हा मात्र गोरेमोरे होतो. कां होतं असं? आपल्यात 'मी ' लपला आहे तो हर्ट होतो म्हणून! हे शरीर नाशिवंत आहे.

एक दिवस मातीत जाणार. याची किंमत ती काय असा विचार केल्यावर मनाला राहत मिळते. सुकून मिळतो. संत तुकारामाला खोडकर पोरांनी रंग फासून गध्यावर फिरवला पण त्या महात्म्याला काही एक वाटलं नाही. संत, महात्मे जाणिवेनेनिवेच्या पलीकडे गेलेले असतात. मान, अपमान, सुख दुःख आमच्या सारख्या सामान्य माणसाला जाणवतं. संतांना नाही. कौतुकाने आम्हाला आभाळ ठेंगणं होतं आणि टीकेने आम्ही धराशयी होतो. सगळा मनाचा आणि विचारांचा घोळ आहे. म्हणूनच मन चंगा तो कटोरीमे गंगा म्हटलं आहे ते खोटं नाही !

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News