ऑनलाईनवर औषधे विकत असाल, तर या नियमांचं पालन कराच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 11 August 2019

मुंबई - ऑनलाईनवरुन औषधांची मागणी करणाऱ्या नेटकऱ्यांना व्हॉटसअपवर डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन कंपनीला पाठविणे बंधनकारक आहे. तसेच ऑनलाईन कंपन्यांसाठीदेखील केन्द्र सरकारच्या ई-पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

मुंबई - ऑनलाईनवरुन औषधांची मागणी करणाऱ्या नेटकऱ्यांना व्हॉटसअपवर डॉक्‍टरांचे प्रिस्क्रिप्शन कंपनीला पाठविणे बंधनकारक आहे. तसेच ऑनलाईन कंपन्यांसाठीदेखील केन्द्र सरकारच्या ई-पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

सर्वसाधारण औषधांसह अन्य गंभीर आजारांची औषधे सर्रासपणे ऑनलाईनवर उपलब्ध होत असतात. याशिवाय महिलांच्या संबंधित अनेक औषधांची विक्रीही नियमांचे उल्लंघन करुन केले जाते, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका मयुरी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायलयात केली आहे. याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

ऑनलाईन औषधी कंपन्यांच्यामार्फत कोणत्याही प्रकारची तपासणी न करता सहजपणे औषधे पुरविली जातात. यामध्ये शासकीय औषध विभागाने निर्धारित केलेल्या एच आणि एक्‍स या गटातील औषधेही असतात. ही औषधे गंभीर आजारांवर असल्यामुळे त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांचे प्रिस्क्रिप्शन असणे आवश्‍यक आहे आणि त्याची तपासणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी याचिकादाराच्या वतीने करण्यात आली होती. मात्र कोणतेही औषध ऑनलाईनवर उपलब्ध करताना संबंधित नेटकऱ्यांकडून प्रिस्क्रिप्शन अपलोड करण्यास सांगितले जाते आणि व्हॉटसअपवरही ते प्रिस्क्रिपश्‍न पाठविण्यास सांगितले जाते. त्याशिवाय दिलेली औषधे मिळू शकत नाहीत, असे उत्पादक कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

केन्द्र सरकारच्या वतीनेही याचिकादाराच्या मागण्यांची दखल घेतली असून ई-फार्मसी पोर्टलबाबतच्या नियमांमध्ये अद्ययावत्तता आणण्याचे काम सुरू केले आहे. यानुसार सर्व ऑनलाईन कंपन्यांना त्यांच्या कंपनीची नोंद केन्द्र सरकारच्या संकेतस्थळावर करणे बंधनकारक राहणार आहे. या नियमावलीचा प्रारुप मसुदा तयार करण्यात आला असून त्यावर सूचना आणि हरकती मागविण्यात आलेल्या आहेत. येत्या ता. 28 पर्यंत या नियमावलींचा अंतिम आराखडा तयार होईल, असा दावाही केन्द्र सरकारच्या वतीने न्यायालयात करण्यात आला आहे. या नियमांचे पालन करणे सर्व कंपन्यांसाठी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असणार आहे. खंडपीठाने याबाबत समाधान व्यक्त केले असून याचिका निकाली काढली आहे. 
--

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News